पोलिसांनी प्रबोधन मोहीम थांबवण्यास सांगितली !
पुणे : हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल वाढला. महानगरपालिकेने बांधलेले हौद ओस पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अन्य पोलिसांसमवेत येऊन मोहिमेस विरोध करून ती थांबवण्यास सांगितले. (पोलिसांच्या अशा मनमानी आणि अन्याय्य वर्तणुकीमुळेच सर्वसामान्यांना त्यांचा आधार वाटत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून श्री गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत असतांना तेथील महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांना उद्घोषणा करणे थांबवण्यास सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात