तमिळनाडूत गेल्या आठवडाभरात हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणाच्या ४ घटना झाल्यावरही त्याविरोधात देशभरातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना अथवा नेता आवाज उठवत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद होय !
काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत हिंदूंचा निर्वंश करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोइम्बत्तूर : येथील सुब्रह्यण्यम्पलायम् येथे ४ धर्मांधांच्या टोळीने २२ सप्टेंबरच्या रात्री सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली. या घटनेने तमिळनाडूतील कोइम्बत्तूर आणि तीरुपूर जिल्ह्यांत तणाव निर्माण झाला. हिंदू मुन्नानीचे राज्य अध्यक्ष श्री. कडेश्वर सुब्रह्मण्यम् यांनी २३ सप्टेंबरला राज्यभर बंद पाळण्याचे आवाहन केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकुमार (वय ३६ वर्ष) दुचाकीवरून घरी परतत असतांना ४ जणांनी त्यांचा दुचाक्यांवरून पाठलाग केला आणि त्यांना कोयात्यांनी भोसकून ते फरार झाले. शशिकुमार यांच्या अंगावर ११ जखमा झाल्याने ते गंभीर घायाळ झाले. त्यांना त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मावळली. हिंदू मुन्नानीचे राज्य अध्यक्ष श्री. कडेश्वर सुब्रह्मण्यम् यांनी सांगितले की, अनंत चतुर्दशीपासून हिंदू नेत्यांवर आक्रमणे होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावरून पोलिसांची अकार्यक्षमता लक्षात येते. कोइम्बत्तूर आणि तीरुपूर जिल्ह्यांत शुक्रवारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. घटनास्थळी शांतता राखण्यासाठी ५०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. काही व्यक्तींनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली.
हत्येचा निषेध करण्यासाठी कोइम्बतूर येथे २३ सप्टेंबर या दिवशी ३ सहस्र हिंदूंनी मोर्चा काढला.
हिंदु नेत्यांच्या हत्यांकडे तमिळनाडूतील सर्व राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून पूर्णत: दुर्लक्ष ! – श्री. राधाकृष्णन्, अध्यक्ष, शिवसेना तमिळनाडू
तमिळनाडूतील हिंदु नेत्यांवर आणि हिंदुत्वनिष्ठांवर गेली २५ वर्षे आक्रमणे होत आहेत. त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या धर्मांधांकडून हत्या करण्यात आल्या आहेत. हत्यांच्या या वृत्तांकडे राज्यातील सर्वच प्रसारमाध्यमे कानाडोळा करतात. तर डीएम्के, एआयएडीएम्के, काँग्रेस, साम्यवादी अशा सर्वच राजकीय पक्षांचे नेते मृत हिंदु नेत्यांच्या कुटुंबांना साहाय्यता निधी देणे तर सोडाच, पण त्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वनही करत नाहीत आणि निषेध नोंदवत नाहीत. सर्व पक्ष मुसलमानांसमवेत आहेत. आतापर्यंत १२७ हिंदु नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत; परंतु राज्य सरकार या प्रकरणांच्या विरोधात कोणतीच कारवाई करत नाही. दुसरीकडे अल्पसंख्यांकांच्या सणांच्या दिवशी क्षुल्लक कारणावरूनही हिंदुत्वनिष्ठांना तत्परतेने अटक करण्यात येते, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूतील शिवसेना राज्य प्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराला दिली.
केंद्र सरकारकडून शिवसेनेच्या काय अपेक्षा आहेत, या संदर्भात बोलतांना राधाकृष्णन् म्हणाले, आज हिंदूंच्या दृष्टीने देशात तमिळनाडू हे सर्वांत धोकादायक राज्य झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे अतिशय गांभीर्याने पहायला हवे. स्थानिक पोलिसांसमवेत सीबीआय इत्यादी यंत्रणांनी हिंदु नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणाचे अन्वेषण करायला हवा.
चेन्नई येथे २५ सप्टेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भव्य निषेध मोर्च्याचे आयोजन !
हिंदु नेत्यांवरील वाढत्या आक्रमणांचा निषेध करण्यासाठी तमिळनाडू राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना चेन्नई येथे २५ सप्टेंबर या दिवशी भव्य निषेध मोर्चा काढणार आहेत. या वेळी राज्य सचिवालयाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्णन् यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात