धर्मांधांच्या दहशतीमुळे दुर्गा पूजेला अनुमती नाकारण्यासाठी बंगाल पाकिस्तानात आहे का ? केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच बंगालमधील हिंदूंची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलकाता : बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात असलेल्या कांगलापहार गावात हिंदूंची ३०० आणि मुसलमानांची २५ घरे असूनही प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल या कारणास्तव हिंदूंना दुर्गापूजा उत्सव साजरा करण्यास अनुमती नाकारली आहे. अशाच प्रकारे अनुमती नाकारण्याचे हे चवथे वर्ष आहे. (गेली ४ वर्षे हिंदूंना दुर्गापूजेसाठी अनुमती नाकारणे ही त्यांना राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याची होणारी गळचेपीच होय ! राज्यघटनेच्या अवमानावरून आकाशपाताळ एक करणारे पुरोगामी आता तोंड का उघडत नाहीत ? देशातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनाही हे लज्जास्पद आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. दुर्गापूजा उत्सव समितीच्या आयोजकांनी जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी इत्यादी अधिकार्यांना पत्रे देऊन, भेटी घेऊन दाद मागितली; मात्र कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही.
२. बीरभूम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एन्. सुधीर कुमार यांनी या प्रकरणाविषयी अनभिज्ञता दर्शवली. यासंबंधी आयोजन समितीने आधी १ सप्टेंबर आणि नंतर २३ सप्टेंबर या दिवशी पत्रे देऊनही अद्याप त्यांना उत्तर मिळालेले नाही. येथील रहिवाशांना ८ किलोमीटर प्रवास करून दुर्गापूजेसाठी शेजारच्या गावात जावे लागत आहे.
३. आयोजकांचे म्हणणे आहे की, प्रशासन मुसलमानांना घाबरून अनुमती देत नाही; मात्र जिल्हाधिकारी यांनी टोलवाटोलवी करून उप-विभागीय अधिकार्याला अधिकार आहेत, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. यासंबंधी उच्च न्यायालयातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
४. दुर्गापूजेसाठी गावकर्यांनी सिद्ध दुर्गेची मूर्ती अर्धवट अवस्थेत पडली आहे.
५. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, प्रशासनाने आधीच किती दुर्गापूजा उत्सव होतील याची सूची अंतिम केली आहे. आता नवीन पूजा उत्सवांना अनुमती मिळणार नाही. (दुर्गापूजेवर मर्यादा घालण्याचा हा प्रकार झाला. दर्गापूजा हा हिंदूंचा अधिकार आहे. अशी भूमिका धर्मांधांच्या उत्सवाच्या वेळी घेण्याची धमक प्रशासन दाखवू शकेल का ? ममता(बानो) यांच्या पक्षाला सत्तेत बसवणार्या हिंदूंना ही शिक्षा होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात