Menu Close

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा – हिंदु जनजागृती समितीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

सांगली : भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. तरी सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहखात्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *