Menu Close

श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढवली !

  • पोलीस अहवालानुसार बंदी वाढवली

  • प्रमोद मुतालिकांवरील बंदीचे तिसरे वर्ष

निधर्मी शासन असल्याचे भासवण्यासाठी राज्यशासन ज्याप्रमाणे ख्रिस्त्यांना झुकते माप देणारे निर्णय घेते; त्याप्रमाणे हिंदूंसाठी प्रमोद मुतालिक यांच्यावरील बंदी का उठवत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

pramod_mutalik1

पणजी : श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांंच्यावरील गोवा प्रवेशबंदी राज्यातील भाजप शासनाने १५ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार ही प्रवेशबंदी वाढवली आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुतालिक यांच्यावरील बंदीचे हे तिसरे वर्ष चालू आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर प्रथम १९ ऑगस्ट २०१४ या दिवशी सहा मासांसाठी गोवा प्रवेशबंदी घालण्यात आली होती आणि यानंतर दर सहा मासांनी या बंदीमध्ये वाढ करण्यात आली.

१९ ऑगस्ट २०१६ या दिवशी श्री. मुतालिक यांच्यावरील बंदीला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. श्री. मुतालिक यांच्यावर सध्या असलेली बंदी १५ सप्टेंबर या दिवशी संपली. गृह खात्याचे अपर सचिव रोहन कासकर यांनी नव्याने आदेश काढून श्री. मुतालिक यांच्यावरील राज्यातील प्रवेश बंदी १५ जानेवारी २०१७ पर्यंत वाढवली आहे. फौजदारी दंड संहिता कायदा १९७५ च्या १४४ कलमातील तरतुदीचा उपयोग करून राज्य शासनाने ही बंदी चार मासांसाठी वाढवली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील पोलीस अधीक्षकांनी श्री. मुतालिक यांच्यावरील बंदीचा काळ वाढवण्याची आवश्यकता आहे, असा अहवाल दिल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. बंदी उठवल्यानंतर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, तसेच धार्मिक सलोखा बिघडू शकतो. राज्यातील जनतेच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, असे शासनाने आदेशात म्हटले आहे. (राज्यात तालिबानचा प्रमुख येऊन गेलेला चालतो, आतंकवादी यासिन भटकळ वास्तव्य करून गेलेले चालते; मात्र निरपराध आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांची मात्र गोवा शासनाला काविळ आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *