गुन्हेगारी कृत्ये करणार्या पोलिसांना गुन्हेगारांपेक्षा अधिक कठोर शिक्षा न्यायालयाने करावी, ही अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोईम्बतूर (तमिळनाडू) : तमिळनाडूमध्ये ३ पोलिसांनी हवालाचे ३ कोटी ५० लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. यांपैकी एक जण करूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुथुकुमार असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही अशाच एका चोरीच्या प्रकरणात मुथुकुमार यांचा हात असल्याचे उघड झाले होते.
पोलिसांनी सोन्याच्या व्यापाराची गाडी पळवली !
पोलिसांच्या या टोळीमध्ये पोलीस निरीक्षक मुथुकुमार, उपनिरीक्षक सरवानन आणि पोलीस शिपाई धर्मेंद्रन यांचा समावेश आहे. या टोळीने २५ ऑगस्टला कोईम्बतूरच्या इचनारी येथे वाहनांची तपासणी करत असल्याचे भासवून एक गाडी अडवली. या गाडीमध्ये केरळच्या मलप्पूरम् येथील सोन्याचे व्यापारी अन्वरसाद यांचे सहकारी होते. पोलिसांनी त्यांना गाडीची झडती घ्यायचे असल्याचे सांगितले. एका पोलिसाने त्या आलिशान गाडीचा ताबा घेतला आणि गाडी महामार्गावर घेऊन गेले. बरेच पुढे गेल्यानंतर पोलिसाने अन्वरसाद यांच्या सहकार्यांना महामार्गावर उतरण्यास सांगितले आणि गाडीसह पळ काढला.
सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे पोलिसांचा सहभाग असल्याचे सिद्ध
अन्वरसाद यांचे एक सहकारी महंमद मुशीर याने अन्वरसाद यांना पोलीसांनी गाडी पळवल्याचे सांगितले. अन्वरसाद यांनी त्यांची गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत केली; मात्र त्यांनी गाडीतील हवाल्याचे ३ कोटी ५० लाख रूपये चोरीला गेल्याची तक्रार केली नाही. चेन्नई येथील पोलीस पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या लूटमारीमध्ये पोलीस सहभागी असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी मुथुकुमार, सरवानन आणि धर्मेंद्रन यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments