भारतात अल्पसंख्यांक लोकप्रतिनिधींविषयी असे कधी घडू शकते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे विधानसभा अध्यक्ष असद कैसर यांनी हिंदु नेते बलदेव कुमार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार दिला. तहरीक-ए-इन्साफचे नेते कुमार विधानसभा अध्यक्षांच्या या व्यवहाराच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत.
पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे अल्पसंख्यांक मंत्री सरदार सूरन सिंह यांची हत्या झाल्यानंतर अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात दुसर्या स्थानावर असलेले बलदेव कुमार यांना निर्वाचित घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येणार होती.
सरदार सूरन सिंह यांची अज्ञात बंदूकधार्यांनी गोळी मारून हत्या केली होती. या हत्येचे तहरीक-ए-तालिबान या संघटनेने दायित्व स्वीकारले होते; परंतु या हत्येत बलदेव कुमार यांचा सहभाग असल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या कुमार कारागृहात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कैसर यांनी कुमार यांना शपथ देण्यास नकार दिला. (आतंकवादी संघटनेने सिंह यांना ठार मारल्याचे दायित्व स्वीकारले असतांनाही पाक बलदेव कुमार यांना कारागृहात डांबून ठेवते, यावरून पाकचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात