Menu Close

अमेरिकी संस्कृतीमध्ये हिंदूचे अमूल्य योगदान : डोनाल्ड ट्रम्प

donald_trump

१५ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये रिपब्लिकन हिंदू युती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत. ट्रम्प म्हणाले, अमेरिकी संस्कृती आणि जागतिक नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हिंदू समाजाने सुंदर योगदान दिले आहे. दोन्ही देशांमधील मुक्त व्यवसाय धोरण, कामाची चिकाटी आणि प्रेम, कौटुंबिक मूल्यांवरील निष्ठा या समान धाग्यांचा गौरव केला गेला पाहिजे, असे आपल्याला वाटते, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी २४ सेकंदाचा एक व्हिडीओ देखील अपलोड केला आहे. या व्हिडीओत ट्रम्प म्हणतात, रिपब्लिक हिंदू युती मेळाव्यात तुम्हाला निमंत्रित करताना मला आनंद होतो. या मेळाव्यात हजारो भारतीय अमेरिकी मंडळींशी बोलता येईल आणि याचा फायदा शेवटी अमेरिकेला होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दिवसभर चालणाऱ्या या मेळाव्यात बॉलिवूडचे कलाकार, गायक, डान्सर सहभागी होतील. याशिवाय हिंदू धर्मगुरु आणि नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

इस्लामिक दहशतवादाचे बळी पडलेल्यांना या मेळाव्यातून फायदा होईल असे या कार्यक्रमाच्या आयोजकांचे म्हणणे आहे. भारतीय अमेरिकन शाली कुमार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शाली कुमार हे ट्रम्प यांच्या आशिया पॅसिफिक विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहे. या कार्यक्रमात सुमारे १० हजार जण हजर राहतील असा आयोजकांचा अंदाज आहे. गेल्या दोन निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भारतीयांच्या कार्यक्रमात हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *