कल्याण (ठाणे) : मशिदीवरील भोंग्यांतून होणार्या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही. मशिदीत लावण्यात येणारे भोंगे कायद्यांचे उल्लंघन करून लावलेले असतात. पहाटे दिली जाणारी अजान शाळेकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना त्रासदायक ठरते. असे असतांनाही पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते. हाच का सर्वधर्मसमभाव, हीच धर्मनिरपेक्षता का, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले. येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, शिवछत्रपती प्रतिष्ठान, स्वराज्य हिंदु सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा आणि भाजप इत्यादी हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यांसह असे एकूण ८० धर्माभिमानी उपस्थिती होते.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. जालना येथून आलेले श्री. दिगंबर खांडेकर आणि त्यांची कन्या कु. रागिणी खांडेकर हे २ घंटे आंदोलनाला उपस्थित होते.
२. बदलापूर येथील शिक्षिका मीना फागणेकर, तसेच सोलापूर येथून आलेले ६५ वर्षांचे गृहस्थ यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
३. धर्माभिमानी श्री. मयुरेश गालिंदे यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
देशद्रोह्यांवर कारवाई नको, तर त्यांना त्वरित फासावर चढवा ! – कैलास जाधव, हिंदु राष्ट्रसेना
काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. तो भारताचा नाही, असे मानणारे आणि गो इंडिया, गो बॅक या देशविरोधी घोषणा देणारे देशद्रोही, तसेच त्याचे समर्थन करणार्या देशद्रोही संघटना यांवर कारवाई न करता फासावर चढवायला हवे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात