कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांची अभिनंदनीय कृती !
कल्याण : येथील भाजपचे शहराध्यक्ष श्री. उपेंद्र डहाके यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या साहाय्याने दोन वासरांना गोशाळेत पाठवून त्यांचे प्राण वाचवले आहेत. या वेळी दोन हवालदारांनी धर्मांधांच्या बाजूने भूमिका घेऊनही उपनिरीक्षिका सौ. प्रिया कटके यांनी केलेल्या चांगल्या सहकार्यामुळे वासरांना गोशाळेत पाठवणे शक्य झाले.
१. येथील एक हिंदुत्वनिष्ठ श्री. नीलेश कुलकर्णी यांना आग्रा रोड येथे दोन वासरे दिसल्यावर त्यांनी भाजप शहराध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांना कळवले. डॉ. डहाके यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात याविषयी लिखित अर्ज दिला.
२. तेथील पोलीस उपनिरीक्षिका सौ. प्रिया कटके यांनी दोन पोलीस हवालदारांना त्या ठिकाणी जाऊन वासरे पाहून पोलीस ठाण्यात त्यांच्याविषयी कळवण्यास सांगितले.
३. घटनास्थळी वासरांना पाहून त्या पोलीस हवालदारांनी आपसात चर्चा केली आणि काही वेळात ते घोड्याला बांधायचा पट्टा जवळ असलेल्या दोन मुलांना घेऊन आले. त्या मुलांना पाहून दोन्ही वासरे दुर्गडीच्या दिशेने पळत सुटली.
४. हा सारा प्रकार पाहून डॉ. डहाके यांनी त्या पोलिसांना जाब विचारला. त्या वर त्या हवालदारांनी ती खलिद नावाच्या व्यक्तीची वासरे आहेत, असे सांगितले. (वासरांना धर्मांधांच्या कह्यात देऊन पोलिसांना त्यांच्याकडून पैसे मिळणार होते, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यावर डॉ. डहाके त्या हवालदारांना म्हणाले, तुम्हाला हे लगेच कसे कळले ? तुम्ही पोलीस उपनिरीक्षिका सौ. कटके यांनी सांगितल्यानुसार त्यांना कळवले का ? असे चालणार नाही. मी न्यायालयात जाईन. माझ्याकडे या संदर्भात अर्ज केल्याची पावती आहे.
५. डॉ. डहाके यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वरील सर्व प्रकार उपनिरीक्षिका सौ. प्रिया कटके यांना सांगितल्यावर त्या पुष्कळ चिडल्या आणि त्यांनी नगरपालिकेच्या अधिकार्यांना संपर्क करून त्या वासरांना गोशाळेत नेण्याची व्यवस्था केली, तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे सिद्ध केली.
६. दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही तेथे आला.
७. तेथे उपस्थित खालिद डॉ. डहाकेंना म्हणाला, पूर्वी मी गायींची हत्या करत होतो आता करत नाही. ही वासरे मी पाळली आहेत. ही आमची वासरे आहेत. असे म्हणून पोलीस समोर असतांनाही खालीद याने डॉ. डहाके यांच्यासमवेत अरेरावी करून त्यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. (पोलिसांचे भय नसलेले धर्मांध ! काही अघटित घडले असते, तर कोण उत्तरदायी झाले असते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
८. या ठिकाणी उपनिरीक्षक सौ. कटके या स्वतः पोलिसांचा फौजफाटा घेऊन आल्या. त्या धर्मांधांना म्हणाल्या, तुमच्या कह्यात ती वासरे मिळणार नाहीत. तुम्ही गोशाळेतून सोडवून घ्या. इतके दिवस ती तिथे बेवारसपणे फिरत होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात ? आता ती गोशाळेत जाणार आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील, तर न्यायालयातून वासरे सोडवा. अधिक वाद घालाल तर तुमच्यावर कारवाई करू.
९. नंतर खालीद घाबरून गप्प बसला. यानंतर दोन्ही वासरांना भिवंडी तालुक्यातील आनगाव येथील गोशाळेत पोचवण्यात आले. (हिंदुत्वनिष्ठांची योग्य ती बाजू घेऊन धर्मांधांना खडसवल्याविषयी आणि वासरांचे प्राण वाचवल्याविषयी पोलीस उपनिरीक्षक सौ. प्रिया कटके यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१०. दोन पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे एका घंट्याच्या कामासाठी दहा घंटे वाया गेले, तसेच तणावाचे वातावरणही निर्माण झाले. त्यात अनेकांचा वेळही वाया गेला, अशी चर्चा जमलेले नागरिक करत होते.
११. या वेळी डॉ. डहाके यांच्यासमवेत श्री. विजय ठाकरे, श्री. निखिल चव्हाण, श्री. अमोल पवार, धर्माभिमानी श्री. सुरेश जोशी, बजरंग दलाचे श्री अमोल झवेरी आणि त्यांचे २५ कार्यकर्ते, विहिंपचे श्री. पराग तेली आणि धर्माभिमानी श्री. पेंडभाजे आदी उपस्थित होते. (संघटितपणे कृती करून गोरक्षा करणार्या सर्व धर्माभिमानी हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१२. ही घटना घडल्यानंतर डॉ. डहाके यांच्या दवाखान्याच्या बाहेर येऊन काही धर्मांध छायाचित्र काढून घेऊन गेले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात