हिंदूंना भगवा ध्वज लावू देण्यास विरोध करायला हा भारत आहे कि पाक ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
हाजुरी (ठाणे) : येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला. (आज हिंदू असंघटित असल्यानेच धर्मांध असा उद्दामपणा करण्यास धजावतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) या विरोधात स्थानिक हिंदूंनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांनी मुसलमानांची समजूत काढून त्यांना त्यांचा ध्वज काढायला लावला.
२४ डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी हिंदूंनी भगवा ध्वज लावण्याचा आग्रह केल्यावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांनी हिंदूंना आवाहन केले, “आज मुसलमानांचाही सण असल्याने आपण आजचा दिवस येथे भगवा ध्वज लावू नये. उद्या आपण तेथे ध्वज लावू शकता. आवश्यक हवे असल्यास मी स्वत: तेथे उभा राहीन.” दत्त जयंती असतांनाही हिंदूंनी वरिष्ठ पोलिस निरिक्षकांचा मान राखून भगवा ध्वज लावला नाही; परंतु दुसर्या दिवशी पोलिसांनी कोलांटीउडी घेत ध्वज लावण्यास मनाई केली. पालिकेच्या अनुमतीविना कोणताही ध्वज लावल्यास कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शनिवारी मारुति मंदिराजवळ अनुमतीविना आरती करू नये आणि ‘उगीचच श्रीरामाचा जयघोष करू नये’, असेही हिंदूंना बजावण्यास आले. (प्रत्येक वेळी हिंदूंचीच मुस्कटदाबी का ? पोलीस आणि धर्मांध यांची अरेरावी सहन करावी लागू नये, यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हाजुरी हा मुसलमानबहुल भाग असल्याने स्थानिक हिंदूंवर नेहमीच अशा प्रकारे अत्याचार होतात. तेथील एक हनुमान मंदिर विकासकामाच्या नंतर गेली १० वर्षे जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहे. या मंदिराच्या बाहेर आता मुसलमान मांसयुक्त पदार्थांची विक्री करतात, तसेच हाडे, मांस मंदिराजवळच टाकत असतात. स्थानिक हिंदूंमधे याविरोधात असंतोष असून ‘हे अपप्रकार बंद होऊन आम्हाला सन्मानाने जगता यावे’, अशी मागणी ते करत आहेत. (केवळ मागणी नको, तर अपप्रकार दूर करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा द्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात