Menu Close

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या २०० काँग्रेसींवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट !

पाकची निर्मिती करणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळी घोषणा काय असणार ? अशांना शिक्षा म्हणून पाकमध्येच पाठवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जनतेने व्यक्त केली, तर त्यात चूक ते काय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) : येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित शर्मा यांनी हा गुन्हा प्रविष्ट केला आहे.

२४ सप्टेंबरला काँग्रेस कार्यकर्त्यांनी उरी येथील आक्रमणाच्या विरोधात निदर्शने केली होती. त्या वेळी त्यांच्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. यावरून पोलिसांनी मुरादाबादचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. ए.पी. सिंह, माजी ब्लाक प्रमुख एजाज, मुशाहिद चौधरी आणि यासीन कुरैशी यांच्यासह एकूण २०० जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. डॉ. ए.पी. सिंह यांनी मात्र अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचा आरोप फेटाळला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *