संभाजीनगर येथील घारेगांव आणि अंधानेर येथे गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु संघटन मेळावा
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने महिलांवरील अत्याचारात १ ला आणि बलात्कारात २ रा क्रमांक मिळवला आहे. स्वत:च्या रक्षणाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी व्हायला हवे. तसेच धर्मांधांच्या लव्ह जिहादसारख्या षड्यंत्रांना बळी न पडता धर्माचरण करून धर्माभिमानही वृद्धींगत करायला हवा. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रबोधनाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. आज उत्सवाचे स्वरूप बिघडत चालले आहे. याविषयी जागृती निर्माण करण्यासाठीच हा हिंदु संघटन मेळावा आहे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगांवकर यांनी केले. घारेगांव येथील मारुति मंदिरात गौरी विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या वतीने हिंदु संघटन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
विघ्नहर्ता गणेश मंडळा चे संस्थापक श्री. किशोर गव्हाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा आरंभ करण्यात आला. या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती देणार्या फ्लेक्सचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणाची काही प्रात्यक्षिके या वेळी सादर केली. घारेगांवसह आडगाव आणि हिरापूर येथील १७० धर्माभिमान्यांनी याचा लाभ घेतला.
कु. क्रांती पेटकर यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. गावातील धर्मशिक्षणवर्गातील ५-६ धर्माभिमान्यांनी मेळाव्याची सिद्धता आणि प्रसार केला होता.
क्षणचित्रे
१. मेळावा चालू असतांना तेथे ५ धर्मांध आले. त्यांना जायला सांगूनही ते ऐकत नव्हते. शेवटी टिळा लावण्यासाठी गेल्यानंतर ते तेथून निघून गेले.
२. गौरीविसर्जनाचा दिवस असूनही गावातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
अंधानेर येथील हिंदु संघटन मेळावा
घारेगांव प्रमाणे अंधानेर येथील संत सावता माळी मंदिरातही हिंदु संघटन मेळावा घेण्यात आला. या वेळी ह.भ.प. आनंद महराज तुपे, ह.भ.प. सुरेंद्र महराज रहाणे, अंधानेरच्या सरपंच सौ. कांताबाई दाबके, मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित होते. सौ. कांताबाई दाबके यांनी कु. प्रतिक्षा कोरगांवकर यांचा सत्कार केला. या मेळाव्याला ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून वक्त्यांचे स्वागत करण्यात आले.
क्षणचित्रे
१. गावात स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली. सर्वांनीच कार्यक्रम आवडल्याचे सांगितले. मेळाव्यात हिंदु राष्ट्राच्या मागणीला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन पाठिंबा दिला.
२. मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच मार्गदर्शना दरम्यान त्या घोषणा देत होत्या.
३. गावातील पांडे टेंट हाऊस ने ध्वनीक्षेपक यंत्रणा, व्यासपीठ आणि विद्युत व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिले.
४. कार्यक्रमानंतर सरपंच सौ. कांताबाई दाबके यांनी देवघराची रचना कशी असावी हे जाणून घेतले आणि त्याप्रमाणे देवघर करण्याची सिद्धता दर्शवली.
५. मेळाव्यानंतर गावात साप्ताहिक सनातन प्रभातचे ९ वर्गणीदार झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात