- केंद्र सरकारने देशातील ६ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्या हिंदूंच्या प्रगतीसाठीही एखादी योजना आणावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
- देशातील इतर समुदायांची प्रगती झालीच, असे आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुसलमानांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रगतीशील पंचायतच्या नावाने देशभर पंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंचायतीद्वारे मुसलमानांच्या समस्या शोधून त्या सोडवण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रगतीशील पंचायतचा प्रारंभ हरियाणातील मुसलमानबहुल मेवात येथून केला जाणार आहे. यात अल्पसंख्यांक कल्याणमंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि अन्य केंद्रीयमंत्री सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, मुसलमानांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार सिद्ध आहे. त्यासाठी या पंचायतीद्वारे देशातील मुसमानांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेसने या योजनेवर टीका करतांना, उत्तरप्रदेशातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केलेला प्रयत्न, असे म्हटले आहे. उलट काँग्रेसने नेहमीच मुसलमानांच्या भल्याचा विचार केला आहे आणि त्यासाठी कामही केले आहे. (काँग्रेसने केवळ मुसलमानांच्या भल्याचा विचार करून त्यासाठीच काम केले आहे, तर हिंदूंना वार्यावर सोडले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रत्येक महिन्यात सरासरी २५-३० पंचायती घेतल्या जाणार आहेत. पुढील ३-४ मासांत अशा पंचायती घेतल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी मुसलमानांसाठी सूफी संमेलनाचेही आयोजन केले होते. यात पंतप्रधान मोदी स्वतः सहभागी झाले होते. मात्र सरकारने हिंदूंसाठी म्हणून अद्याप एकही योजना आखलेली नाही. मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केरळ येथे मुसलमानांना मतांची मंडई समजू नये, असे विधान केले होते, तर त्यापूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, भारतातील मुसलमान देशासाठी जगतात आणि देशासाठी मरतात. ते अल कायदाच्या विचारांना बळी पडणार नाहीत. ऑगस्ट २०१५ मध्ये मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी जगामध्ये इस्लामच्या खर्या स्वरूपाला खर्या रूपात पोचवण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात