नवी देहली : पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये होणार्या सार्क परिषदेवर भारत, भूतान, बांगलादेश यांच्या पाठोपाठ अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही परिषदच स्थगित करण्यात आली आहे. नेपाळकडे यंदाच्या या परिषदेचे अध्यक्षपद होते. नेपाळनेच परिषद स्थगित केल्याचे कळवले आहे.
सार्कच्या एका सदस्य देशाकडून भारतात आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. तसेच भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हा देश ढवळाढवळ करत आहे. या प्रकारांमुळे ही परिषद यशस्वी होणार नाही, असे वातावरण या देशाने निर्माण केले आहे. त्यामुळे आम्ही या परिषदेत सहभागी होणार नाही, असे भारताने नेपाळला कळवले होते. काही अन्य देशही याच कारणामुळे या परिषदेत सहभागी होणार नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. दक्षिण आशियाई देशांच्या विकासासाठी दहशतमुक्त वातावरण असणे आवश्यक आहे, असे भारताने नेपाळला कळवले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात