अशा गुंड पोलिसांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बालाघाट/बैहर (मध्यप्रदेश) : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बैठक चालू असतांना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी बैठक कक्षात प्रवेश करून संघाचे प्रचारक सुरेश यादव यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली. यादव यांना कार्यालयात मारहाण केल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. तेव्हा यादव यांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि औषधाच्या दुकानात गेले अन् तेथे बेशुद्ध झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तेथून त्यांना जबलपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबरच्या रात्री घडली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथे आंदोलन केले आणि २६ सप्टेंबरला बैहर शहर बंद ठेवण्यात आले. यादव यांच्या तक्रारीनंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक राजेश शर्मा, ठाणे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य काही अधिकार्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.
या घटनेच्या दोन दिवसआधी मुसलमान नेते ओवैसी यांच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळावर टीका करण्यात आली होती. याची काही मुसलमान युवकांनी तक्रार केली होती. त्यावरून झिया-ऊल-हक यांनी यादव यांना मारहाण केली. यात तक्रार करणारे नवाब खान, सन्नू खान, दानिश खान आणि शाहीद खान हेही सहभागी होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात