Menu Close

रांची (झारखंड) येथे लव्ह जिहाद : धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अनेक वेळा बलात्कार करून धर्मांतर !

Love_jihad_M

रांची : शहरात पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. इमरान या धर्मांधाने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. याची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) बनवून तिला ब्लॅकमेल केले. तिला ठार मारण्याची धमकी देऊन बलपूर्वक गोमांस खाण्यास लावले. एवढेच नव्हे, तर तिचे नाव पालटून धर्मांतरही केले. येथील पंडरा भागात पीडितेच्या घरात घुसून इमरानने तिला मारहाण केली आणि घरातून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. हे पाहून स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीडितेने इमरानच्या विरोधात तक्रार केली आहे. पीडितेने न्यायालयाला सांगितलेली सूत्रे खालीलप्रमाणे …

बहीण संबोधून पीडितेच्या घरच्यांचा विश्‍वास जिंकला !

पीडितेला तिच्या भावासाठी जुनी दुचाकी खरेदी करायची होती. ओएल्एक्स्वर विज्ञापन पाहून देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला. यातून इमरानशी परिचय झाला. त्याने तिला दुचाकी पहाण्यासाठी बोलावले. पीडितेने जुनी दुचाकी खरेदी केली.

गाडीच्या कागदपत्रांच्या निमित्ताने इमरानने युवतीच्या भावाशी मैत्री केली आणि तिच्या घरी येणे जाणे चालू केले. तो युवतीला बहीण संबोधत असे. त्या बहाण्याने घरातील लोकांचा विश्‍वास जिंकला. त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय व्यक्त केला नाही. इमरानने नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने युवतीकडून शैक्षणिक प्रमाणपत्रे स्वत:कडे घेतली.

ब्लॅकमेल करून अनेक वेळा केला बलात्कार !

एक दिवस नोकरीच्या निमित्ताने इमराने पीडितेला घरातून बाहेर नेले. त्यानंतर तो तिला इस्लामनगर येथील स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेला एका खोलीत नेऊन बलात्कार केला, तसेच याविषयी कोणाला सांगितल्यास बलात्काराचा व्हिडिओ संकेतस्थळावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केले.

कोर्‍या कागदावर बलपूर्वक स्वाक्षरी घेऊन धर्मांतर केले !

इमरानने एका साध्या कागदावर पीडितेची बलपूर्वक स्वाक्षरी घेतली. त्यानंतर तिला बलपूर्वक गोमांस खायला लावले. त्यानंतर त्याने ती मुसलमान झाल्याचे सांगितले आणि त्याने तिचे नाव नुसरत परवीन ठेवले. याला तिने विरोध केल्यावर त्याने पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवला. यात त्याने सर्व तिच्या ईच्छेने झाले आहे, असे बलपूर्वक वदवून घेतले आणि तिला तिच्या घरी पाठवून दिले.

इमरानने पीडितेच्या घरी जाऊन केली मारहाण !

१६ सप्टेंबरला अचानक इमरान पीडितेच्या घरी गेला. तेथे तिच्या आई-भाऊ यांच्या विरोधानंतरही त्याने तिला स्वत:सह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले, ही आता माझी पत्नी आहे. तिने धर्मही पालटला आहे. त्याने युवतीचे कपडे फाडले. तेव्हा शेजार्‍यांनी इमरानला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. इमरानकडे असलेली तिची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे परत मिळवून देण्याची तिने न्यायालयाकडे मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *