Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर करण्याचे कार्यक्रम पोलिसांनी कायमस्वरूपी रहित करावेत ! – भारतीय सिंधु सभा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

गांधीनगर (कोल्हापूर) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील १५० लोकांचे बलपूर्वक आणि आमिष दाखवून धर्मांतर !

k_wed02
पोलीस उपअधीक्षक श्री. अमरसिंह जाधव यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) : गांधीनगर येथे गेल्या काही मासांपासून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. येथे येशूची प्रार्थना करण्याच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित करून सिंधु समाजातील लोकांचे धर्मांतर करण्यात येत आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी पोलिसांनी २७ आणि २८ सप्टेंबर या दिवशी येथे होणारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे कार्यक्रम रहित करावेत, या प्रमुख मागणीचे निवेदन भारतीय सिंधु सभा संघटनेच्या वतीने पोलीस उपअधीक्षक (करवीर) श्री. अमरसिंह जाधव यांना देण्यात आले. या वेळी भारतीय सिंधु समाजातील लोक आणि हिंदुत्ववादी यांची पुष्कळ उपस्थिती होती.

या वेळी विहिंपचे कोल्हापूर महानगरप्रमुख सर्वश्री अशोक रामचंदानी, राजू सुंदराणी, हिरा परमानंदानी, सागर निरंकारी, यश गिडवानी, यश सिंधी, रवी मालानी, दिलीप वासवानी, रमेश कुकडेजा, शाम सावलानी, रवी दरडा, हरेश उदासी, संतोष वाधवा, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, समितीचे शिवानंद स्वामी आणि किरण दुसे आदी धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी श्री. अशोक रामचंदानी आणि श्री. राजू यादव म्हणाले की, पोलिसांसमवेत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली.

गांधीनगर येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, धर्मांतराच्या विषयामुळे गांधीनगर येथे तणावाचे वातावरण निर्माण होईल, अशी कोणतीही घटना घडू नये. यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूची बैठक बोलावून ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या संपूर्ण कार्यक्रमांचे ध्वनीमुद्रण करण्यात येईल, असे आश्‍वासन भारतीय सिंधु सभा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले होते. प्रत्यक्षात कार्यक्रमस्थळी पोलिसांनी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण केलेच नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी ते केले. याचा राग मनात धरून ख्रिस्ती आयोजकांनी बळजोरीने कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना हाकलले. ही गोष्ट पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांसमोरच संघटनेच्या कार्यकर्त्यांना धार्मिक अशांतता पसरवल्याविषयी आणि स्त्रियांचा विनयभंग केल्याविषयी खटला प्रविष्ट करण्याची धमकी दिली. ही गोष्ट गंभीर आहे. गांधीनगर पोलिसांनी ध्वनीमुद्रण केले असते, तर ख्रिस्ती मिशनर्‍यांचे पितळ उघड पडले असते. पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांनी या प्रकरणात लक्ष घालून ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण करण्यात येईल, तसेच त्यांचे धर्मांतराचे कार्यक्रम रहित करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *