Menu Close

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळाकडून श्री गणेशाचे विडंबन

हिंदु जनजागृती समितीकडून विडंबन हटवण्याची मागणी

श्री गणेशाच्या मुखाचे चित्र असलेले टी-शर्ट

हे चित्र छापण्यामागे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून हिंदूंना विडंबन कळावे, हा उद्देश आहे !

मुंबई : क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीशी संपर्क साधून नापसंती व्यक्त केली होती. हिंदु जनजागृती समितीने क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम संकेतस्थळाशी संपर्क साधून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री थांबवण्याची विनंती केली आहे, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी क्षमायाचना करण्याची मागणी केली आहे. याविषयी संकेतस्थळाने कोणताच प्रतिसाद दिलेला नाही.

हिंदु धर्माभिमानी या विडंबनाच्या विरोधात पुढील संपर्कावर वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत.
इमेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *