केर्ले येथील धर्माभिमान्यांची अभिनंदनीय कृती !
केर्ले (जिल्हा कोल्हापूर) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. पंडितराव शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती इतर धर्माभिमान्यांना कळवली. केर्ले गावातील धर्माभिमानी श्री. रामभाऊ मेथे यांच्या नेतृत्वाखाली गावातील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री चंद्रकांत पाटील, येथील कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंचचे कार्यकर्ते सर्वश्री नाना नलवडे, विक्रम माने, सचिन किल्लेदार, अमोल पाटील, सौरभ पाटील, प्रवीण सूर्यवंशी, अमित अतिग्रे, विक्रम माने यांनी सर्व गणेशमूर्तींचे पुन्हा तलावामध्ये विसर्जन केले. (शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात श्री गणेश मूर्तींचे पुन्हा विसर्जन करणार्या सर्व धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! अशी कृती हिंदूंनी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी उपस्थित सर्व
धर्माभिमान्यांना श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचे महत्त्व विशद केले. तसेच अशी कृती पुन्हा होऊ नये, यासाठी सर्वांचे प्रबोधन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात