Menu Close

शिवसमर्थ कोकण ट्रस्टच्या वतीने धर्मकार्याविषयी हिंदु जनजागृती समितीचा गौरव

पुणे : येथे २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि श्री. विनायक बागवडे शिवसमर्थ कोकण ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनील पवार यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. पवार यांनी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित केले होते. शिवसेनेचे नगरसेवक श्री. सचिन दांगट हेही या वेळी उपस्थित होते.

समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करतांना श्री. पवार म्हणाले, “हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते धर्मरक्षणासाठी, तसेच धर्मपरंपरा जोपासाव्यात म्हणून त्यागी वृत्तीने कार्यरत आहेत. आपण त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे”. या वेळी श्री. पवार यांनी उत्स्फूर्तपणे ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम’ असा ३ वेळा जयघोष केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *