१५ लाखांहून अधिक लोकांमध्ये जागृती !
घटस्थापनेच्या दिवशी स्थापना झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा १ ऑक्टोबर २०१६ या दिवशी १४ वा वर्धापनदिन झाला. गेल्या १४ वर्षांपासून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती कार्यरत आहे. त्यानिमित्ताने समितीद्वारे ट्विटर वर #14YearsOfHJS हा ट्रेंड करण्यात आला. या ट्रेंडचा विषय १५ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचला. #14YearsOfHJS हा ट्रेंड ट्विटरवर मुख्य २० विषयांमध्ये प्रथम १९ व्या स्थानावर आला. नंतर तो १४ व्या स्थानापर्यंत काही काळ टिकून होता.
या ट्रेंडद्वारे समितीने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती देणार्या ट्विट्स करण्यात आल्या. यामध्ये समितीच्या विविध मोहिमा, उदा. हिंदु धर्मजागृती सभा, फलकप्रदर्शन, जागो संदेश, उत्सवांमधील अपप्रचार रोखणे, राष्ट्रीय हिंदु आंदोलनातील सहभाग, मंदिर सरकारीकरणाला विरोध, राष्ट्रध्वजाचा मान राखणे, लव्ह-जिहादविषयी जागृती इत्यादी विषयांंसंदर्भातील ट्विट्स करण्यात आल्या. समितीच्या अधिकृत ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या या ट्विट्सला समाजातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात