म्हापसा (गोवा) येथे एक भारत अभियान – कश्मीर की ओर चळवळीच्या अंतर्गत जाहीर सभा !
म्हापसा : काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने कोणी आवाज उठवला नाही. सर्व बुद्धीवादी, खासदार गप्प राहिले. वर्ष १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात काश्मिरी हिंदूंसाठी सोय केली. काश्मिरी हिंदू आणि हिंदुत्वाचे पुनर्वसन होईल, असे राज्य म्हणजेच पनून कश्मीर निर्माण होणे आवश्यक आहे, असे परखड प्रतिपादन विस्थापित काश्मिरी हिंदूंचे नेते श्री. राहुल राझदान यांनी येथे केले.
देशात राष्ट्रवादी शासन आलेले असल्याने काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्यात सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या मागणीला अनुसरून भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एक भारत अभियान-कश्मीरकी ओर हे राष्ट्रव्यापी अभियान आरंभले आहे. या अभियानांतर्गत म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिर सभागृहात २ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, हिंदु महासभेचे गोवा अध्यक्ष श्री. शिवप्रसाद जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री. मनोज खाडये यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला ६०० हून अधिक राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी नागरिकांची उपस्थिती होती.
श्री. राहुल राझदान पुढे म्हणाले, काश्मिरी हिंदू मागील २६ वर्षे पनून कश्मीरच्या मागणीसाठी संघर्ष करत आहेत. शासन आणि काही हिंदू यांना पनून कश्मीर निर्मितीच्या संकल्पाचा विसर पडला आणि यामुळे परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी केवळ काही लक्ष रुपये साहाय्यता देऊन काश्मीरमधील हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये पाठवण्याची योजना बनवण्यात आली; मात्र मागील ८ वर्षांत केवळ १ काश्मिरी हिंदु परत काश्मीरमध्ये गेला आहे. गेल्या सात दशकांत एकही काश्मिरी हिंदु काश्मीरचा मुख्यमंत्री झालेला नाही. काश्मीरमधील शासन तेथील हिंदूंना दुय्यम वागणूक देते. काश्मीरमध्ये हिंदूंना गौण स्थान मिळावे, याच दृष्टीने कायदे बनवले जातात. काश्मीरमधील हिंदूंना हाकलून त्यांचे नागरिकत्व नाकारले जात आहे. काश्मीरमधील हिंदूंमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, काश्मिरी हिंदूंना सन्मानाने जगता यावे आणि काश्मिरी हिंदूंवर पुन्हा पलायन करण्याची पाळी येऊ नये, यासाठी काश्मीरमध्ये हिंदूंसाठी पनून कश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश बनावा अशी काश्मिरी हिंदूंची मागणी आहे आणि ही काळाची आवश्यकता आहे.
शंखनाद आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सभेला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा मांडला आणि सभेचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी काश्मीरच्या समस्येविषयी पनून कश्मीर संघटनेच्या वतीने बनवण्यात आलेली ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, हिंदु महासभेचे गोवा अध्यक्ष श्री. शिवप्रसाद जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री. मनोज खाडये या मान्यवरांनी सभेतील उपस्थितांना संबोधित केले. सूत्रसंचालन श्री. राहुल वझे आणि कु. अरुणी गडेकर यांनी केले.
क्षणचित्र : उरी येथील आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या १८ सैनिकांना दोन मिनिटे स्तब्ध राहून आणि श्री गुरुदेव दत्ताचा नामजप करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेत देण्यात आलेल्या प्रेरणादायी घोषणा
- एकच ध्येय एकच लक्ष्य ! हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र !!
- अरे एवढे हिंदू कशाला? हिंदूंचे राष्ट्र स्थापायला !
- थांबायचे नाही, थकायचे नाही हिंदु राष्ट्राविना स्वस्थ बसायचे नाही !!
- शाश्वत वही सत्य है भारत हिंदु राष्ट्र है !!
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात