Menu Close

हिंदू सुरक्षित, तरच सरकार सुरक्षित ! – आमदार राजासिंह ठाकुर

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील हिंदु धर्मसभेला २ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती !

jabalpur_sabha_rajasing_thakur
डावीकडे बोलतांना आमदार श्री. राजासिंह ठाकुर, श्री. आनंद जाखोटिया (उजवीकडे) आणि अन्य मानवर

जबलपूर (मध्यप्रदेश) : भारतामध्ये जर हिंदूच सुरक्षित नसेल, तर सरकार सुरक्षित रहाण्याची खात्री देता येत नाही. हिंदू सुरक्षित राहिला, तरच सरकार सुरक्षित राहील, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकुर यांनी येथे केले. हिंदु धर्मसेनेच्या वतीने आयोजित विशाल धर्मसभेला श्री. राजासिंह संबोधित करत होते.

व्यासपिठावर डॉ. स्वामी श्यामदेवाचार्य, आचार्य इंद्रभान महाराज, स्वामी पगलानंद, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया आदी उपस्थित होते. या वेळी २ सहस्राहून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

राजासिंह ठाकूर पुढे म्हणाले, आज केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रभक्तांचा अपमान आणि राष्ट्रद्रोह्यांना संरक्षण मिळत असल्याने देशभरातील युवकांमध्ये खदखद आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्र वाचवणे, हे आपले दायित्व असून त्यासाठी संघटित व्हा. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या थांबवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

jabalpur_sabha

आचार्य इंद्रभान महाराज म्हणाले, हिंदूंना शौर्याची परंपरा आहे. अहिंसेच्या नावाखाली हिंदूंचे शौर्य संपवले गेले.

डॉ. त्रिपाठी म्हणाले, आज नवरात्रीला आपण देवीची पूजा करतो, कुमारिकांचे पूजन करतो. त्यासह मुलींना सक्षम आणि स्वसंरक्षणासाठी आपण सिद्ध केले पाहिजे. आज आदिवासी समाजाला फसवून त्याचे धर्मांतर केले जात आहे, हेही आपण रोखले पाहिजे.

हिंदु धर्मसेनेचे अध्यक्ष श्री. योगेश अग्रवाल म्हणाले, लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्या दिवसेंदिवस वाढत असून हिंदु समाज हळूहळू अल्पसंख्यांक होत चालला आहे. हे रोखण्यासाठी आपण जागृतपणे आणि संघटितपणे काम करायला हवे. त्यासह आज हिंदु समाजाला धर्माविषयी जागृत करण्याची वेळ आली आहे. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांना जे विकृत स्वरूप आले आहे, ते पाहून दुःख होते. मुसलमानांच्या छोट्या मुलालाही त्याच्या धर्माविषयी पूर्ण माहिती असते. त्याप्रमाणे हिंदु समाजानेही धर्म समजून त्याप्रमाणे आचरण करायला हवे.
श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, आमच्या प्रत्येक सणांच्या वेळी कायदेशीर अनुमत्यांची जंत्री लावणारे प्रशासन प्रतिदिन मशिदीच्या भोंग्यातून होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या अवैध कृत्याविषयी गप्प का ? अशाच प्रकारे धर्मांधांच्या अवैध कृत्यांना पाठीशी घातल्याने पुढे ते पोलिसांवर हात टाकण्याचे धाडस करतात. भारताच्या डोक्यावर आता इसिसचे संकट असून त्यांना हातभार लावणार्‍या जिहादी घटकांवर वेळीच कारवाई करायला हवी. यासाठी भारतात लपलेल्या आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांच्या विरुद्ध एक सर्जिकल स्ट्राइक शासनाने करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनी आपली स्वाभिमान आणि शौर्याची परंपरा आठवून ती पुढे चालवल्यास हिंदु राष्ट्र लांब नाही.

संघ प्रचारकांवर आक्रमण करणार्‍यांवर तातडीने कारवाई करा ! – राजासिंह ठाकूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालाघाट जिल्हा प्रचारक श्री. सुरेश यादव यांना काही धर्मांधांनी पोलिसांच्या सहकार्याने अमानुष मारहाण केली. या विषयी श्री. राजासिंह ठाकूर म्हणाले, श्री. यादव यांना त्वरित न्याय मिळून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. त्यांना न्याय न मिळाल्यास मी पुन्हा जबलपूरमध्ये येईन आणि त्यांना न्याय मिळाल्याशिवाय येथून जाणार नाही.

क्षणचित्रे

१. सभास्थळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने क्रांतीकारक, हिंदु राष्ट्र, नवरात्र या विषयांवर फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. तसेच सनातन संस्था प्रकाशित आध्यात्मिक आणि राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे विक्री केंद्रही लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन व्यासपिठावरून करण्यात आले.

२. कार्यक्रमापूर्वी जोरदार पाऊस झाला आणि वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यानंतर मागवलेला जनरेटरही चालू होत नव्हता. त्या वेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री. योगेश अग्रवाल यांनी नर्मदामातेला शरण जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस थांबला आणि काही वेळाने वीजही आली. तसेच अनेक अडथळे येऊनही युवक न जाता रात्री १०.३० पर्यंत थांबले होते.

३. या वेळी व्यासपिठावरून मधे मधे जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् चा जयघोष करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *