Menu Close

पाककडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे आंदोलन !

protested_against_pakistan_government
प्रतिकात्मक चित्र

कोटली (पाकव्याप्त काश्मीर) : पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, गिलगिट, कोटली यांसह अन्य ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पाककडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. कोटली येथे एका नागरिकाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांनी निदर्शने केली. यापूर्वीही येथे अशा प्रकारची निदर्शने केली गेली आहेत. त्यांच्या समर्थनार्थ लंडन, जर्मनी, व्हीएन्ना आदी राष्ट्रांतही निदर्शने करण्यात येत आहेत. आयएस्आयपेक्षा कुत्रे अधिक एकनिष्ठ असतात काश्मिरींचे हत्याकांड घडवणारे कसाई पाकिस्तानी सैन्य, अशा प्रकारच्या घोषणाही आंदोलकांकडून देण्यात आल्या.

१. पाकव्याप्त काश्मीरमधील एक मुख्य काश्मिरी राष्ट्रवादी नेते असलेले आरिफ शाहिद यांच्या झालेल्या हत्येची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

२. ६२ वर्षीय शाहिद यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांच्या विरोधात तीव्र लढा दिला होता. वर्ष २०१३ मध्ये रावळपिंडी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमागील सूत्रधार अजूनही सापडलेले नाहीत. शाहिद यांची हत्या आयएस्आयनेच घडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३. आयएस्आयने गेल्या २ वर्षांत पाकव्याप्त काश्मीरमधील १०० पेक्षाही जास्त राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांची हत्या घडवली असल्याचा अंदाज मुझफ्फराबादमधील सर्वपक्षीय राष्ट्रीय आघाडीने वर्तवला आहे. ही निदर्शने आरिफ शाहिद अ‍ॅक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

४. येथील नागरिक भारताच्या विरोधातील आतंकवादी कारवायांत सहभागी होण्यासाठी नकार देत असल्याने पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आय तेथील युवकांचे अपहरण करते आणि त्यांचा छळ करते. या विरोधात नागरिक आवाज उठवत आहेत. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न पाककडून होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पाकच्या तुलनेत भारत चांगला देश आहे, असे या स्थानिकांचे म्हणणे आहे.

५. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी आरोप केला आहे की, भारत येथील वातावरण बिघडवत आहे, तसेच भारतीय प्रसारमाध्यमे यासंदर्भात अपप्रचार करत आहेत. (चोराच्या उलट्या बोंबा ! उलट पाकच काश्मीरमध्ये दगडफेक आतंकवाद्यांच्या माध्यमातून वातावरण बिघडवत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *