युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांचा निष्कर्ष !
आतंकवाद्यांचा समूळ नायनाट करायचा असेल, तर भारताला इस्रायलसारखा प्रखर राष्ट्रवाद अंगी बाणवणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
न्यूयॉर्क : इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना प्रखर राष्ट्रवादी असलेल्या इस्रायल देशाला सर्वाधिक घाबरते, असा निष्कर्ष युरोपियन पत्रकार जर्गेन तोदेनहॉफर यांनी काढला आहे. तोदेनहॉफर यांनी वर्ष २०१५ मध्ये इस्लामिक स्टेट.च्या सान्निध्यात १० दिवस काढल्यानंतर म्हटले आहे की, इस्लामिक स्टेट.च्या जागतिक विस्तार नियोजनांमध्ये अर्ध्याहून अधिक जगाचा समावेश असला, तरी त्यात इस्रायल देशाचा समावेश नाही.
एका ज्यू वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जर्गेन तोदेनहॉफर म्हणतात, अमेरिका तसेच इंग्लंड यांच्या सैन्याला आतंकवाद्यांविरुद्ध लढण्याचा सराव असला, तरी आम्ही त्यांचा पराभव करू शकतो, असे इस्लामिक स्टेट ला वाटते; मात्र गनिमी काव्याने तसेच आतंकवाद्यांशी लढण्याची इस्रायलची क्षमता अजोड असल्याने इस्लामिक खिलाफत स्थापन करण्यात इस्रायल हा देशच सर्वांत मोठा अडथळा ठरला आहे. गेल्या ऑक्टोबर मासात सार्वजनिक केलेल्या ध्वनीचित्रफीतमध्ये इस्लामिक स्टेटने इस्रायलची राजधानी जेरुसलेम शहरातील एकूण एक ज्यू नागरिकांना मारून टाकण्याची धमकी दिली आहे. (इस्रायलसारख्या चिमुकल्या देशाला इस्लामिक स्टेट घाबरून आहे, तर भारतासारखा १२५ कोटी जनसंख्येचा देश शेजारच्या शत्रू राष्ट्राला धमकावूही शकत नाही. जोपर्यंत भारतीय जनतेत इस्रायलसारखा प्रखर राष्ट्रवाद निर्माण होत नाही, तोपर्यंत नेपाळसारखा दुर्बल देशही आपल्याला वाकुल्या दाखवण्यात मागे हटणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात