चेन्नई : कोळतुर, चेन्नई येथे २७ सप्टेंबरला विवेकानंद निवासी संस्थेच्या वतीने तिरुपती कोडैच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग घेण्यात आला. प्रतिवर्ष भक्तमंडळी श्री तिरुपती बालाजीला कोडै म्हणजे सुशोभित छत्र अर्पण करतात. हे छत्र घेऊन जात असतांना मार्गात येणार्या मंदिरांत किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याची पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी अन्नदानासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.
असाच एक कार्यक्रम कोळतुर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार आणि सौ. उमा रविचंद्रन् यांनी सत्संग घेतला. त्यांनी आचारधर्म, साधना, पितृपक्षाचे महत्त्व आणि नवरात्री आदी ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या एका उद्योजकाने सनातनचे ५०० तामिळ पंचांग पुरस्कृत करण्याची सिद्धता दर्शवली.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या ठिकाणी ध्वनीवर्धकाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. ध्वनिवर्धकावरून सत्संगातील प्रवचनाचे शब्द कानावर पडल्याने शेजारच्या काही महिला कार्यक्रमस्थळी आल्या. दोन गृहिणींना विषय पुष्कळ आवडला आणि त्यांनी प्रत्येक ग्रंथ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.
२. एक गुजराती महिला कामावरून परततांना पाठदुखीचा त्रास होत असल्याने डॉक्टरांना भेटण्यासाठी जात होती. तेवढ्यात ती सत्संगाच्या ठिकाणी पोचली आणि प्रवचन ऐकण्यासाठी ती थोडा वेळी तिथे बसली. प्रवचन ऐकल्यानंतर काही मिनिटातच तिची पाठदुखी पूर्णपणे थांबली, असे तिने सांगितले.
३. तेथील मंदिरातील पुजार्याला स्वतःची कुलदेवता माहीत नसल्याने कोणत्या देवतेचा जप करायचा हे माहीत नव्हते. त्याविषयीची शंका उपस्थित भाविकांपैकी एकाने सत्संगात विचारली. त्या वेळी दिल्या गेलेल्या उत्तराने पुजार्याचेही शंका निरसन झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात