केरळच्या आलापुझा जिल्ह्यात आंतरधर्मीय सलोखा बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
आलापुझा (केरळ) : केरळ राज्याच्या तीन जिल्ह्यांतील किनारपट्टीच्या भागात काम करणार्या व्हिन सेंटर या सामाजिक संघटनेच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. हिंदु धर्माच्या प्रतिनिधी म्हणून कु. प्रणीता सुखटणकर यांनी लोक: समस्थ सुखिनो भवन्तु या विषयावर विचार मांडले. हिंदु धर्मानुसार साधना करण्याचे विविध मार्ग त्यांनी या वेळी विषद केले. या कार्यक्रमाला अनुमाने ८०० लोक उपस्थित होते. या वेळी ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते.
कु. प्रणीता सुखटणकर यांनी भारताच्या वैभवशाली इतिहासाविषयी सांगतांना म्हटले की, त्या काळी वेगवेगळ्या देशांतील लोकांचा भारतियांनी कुठलीच शंका न घेता स्वीकार केला. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्मामुळे ते शक्य झाले. बर्याच इतिहासकारांनी भारत आणि हिंदु धर्म यांच्या बाजूने विचार मांडले. सध्या समाजामध्ये जी अस्थिरता दिसून येते, त्याला धर्माचरण आणि साधना यांचा अभाव हेच कारण आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात