सातारा येथे हिंदु धर्मजागृती सभा
सातारा : गेली अनेक वर्षे हिंदू दयनीय स्थितीत जीवन व्यतीत करत आहेत. गांधी आणि नेहरू यांच्या निर्णयांची फळे आजही आपण आणि आपले सैन्य सीमेवर भोगत आहोत. इस्रायलप्रमाणे राष्ट्राभिमान बाळगण्यास आपण आजही अल्प पडत आहोत. हिंदू शौर्याची इतिहासगाथा विसरले आहेत. मूठभर मावळ्यांना हाताशी घेऊन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे आतंकवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आता आपल्यापुढे हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, असे प्रतिपादन सौ. रूपा महाडिक यांनी केले.
मेढा येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाहीर हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्या बोलत होत्या. या वेळी मेढा आणि पंचक्रोशीतील ६० हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. सभास्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फॅक्ट आणि क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
२. मेढा येथील श्री. गाडगीळ यांनी सभेच्या उद्घोषणेसाठी वाहन विनामूल्य उपलब्ध करून देऊन स्वत: उद्घोषणा केली. तसेच प्रदर्शन लावण्यासाठी स्वत: साहाय्यही केले.
३. सभेनंतर घेतलेल्या बैठकीत कुसुंबी गावातील युवकांनी धर्मसभेच्या वातावरणाने प्रभावित होऊन त्यांच्या गावात नवरात्रीत धर्मसभेची मागणी केली. त्यासाठीच्या पूर्वसिद्धतेचीही सिद्धता दर्शवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात