Menu Close

तळंदगे (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

kiran-dhuse

तळंदगे : येथील श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता सहभाग घेण्यात आला. श्री दुर्गादौडीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला २२५ धर्माभिमानी आणि बालगोपाळ यांची उपस्थिती होती.

येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवाजीराव मोटे यांच्या नेतृत्वाखाली दौडीचे आयोजन करण्यात आले होते. येथील शिवाजी चौकात दौडीचा समारोप झाला. या वेळी श्री दुर्गादेवी मंडळाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री दुर्गादेवी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री सुनील शिंगाडे, कार्यकर्ते शहाजी पवार, संजय शिरोळे, रामचंद्र सरगर, सतीश भोसले, प्रशांत कुंभार, चंद्रकांत कदम, संजय चौगुले, डॉ. दीपक सोलनकर आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

क्षणचित्र – कार्यक्रमस्थळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म या संदर्भात असलेल्या सनातन पंचांगांविषयी माहिती दिली. या ठिकाणी ४५ सनातन पंचांगांचे वितरण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *