नृसिंहवाडी येथील घटना !
- संतप्त जमावाकडून धर्मांधाच्या दुकानांची तोडफोड !
- देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून कठोर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) : येथील गौरवाड गावात रहाणारा मोहसीन मोजम कोल्हापुरे (वय २५ वर्षे) या धर्मांधाने व्हॉट्स अॅप या सामाजिक संकेतस्थळावर राष्ट्रीय भावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती टाकल्याने त्याच्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथील २ दुकानांची संतप्त जमावाने तोडफोड केली. ही घटना ३ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता घडली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मोहसीनवर गुन्हा प्रविष्ट करून त्याला अटक केली आहे. मोहसीन याला ४ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१. मोहसीन कोल्हापुरे याने व्हॉट्स अॅपवर कार्टूनद्वारे राष्ट्रीय भावना दुखावणारा संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने भारताला तुच्छ लेखून पाकचा उदोउदो केला.
२. यात त्याने शिकारी गरुड दुसर्या एका पक्षाची शिकार करत आहे, असे चित्र दाखवले होते. यात गरुडाच्या पंखावर पाकिस्तानचा झेंडा दाखवण्यात आला होता, तर ज्याची शिकार होत आहे, त्या पक्षाच्या पंखावर भारतीय झेंडा दाखवण्यात आला होता. या प्रकरणी त्या गटातील एक हिंदु धर्माभिमानी श्री. शुभम दिलीपकुमार कुंभोजे यांनी तक्रार दिली आहे.
३. या संदेशामुळे संतप्त जमावाने कोल्हापुरे याच्या घरावर दगडफेक करून नृसिंहवाडी येथील कोल्हापुरे याचे मिठाईचे दुकान उद्ध्वस्त केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक नरळे, शिरोळचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आदी पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी आले. या घटनेचे पडसाद कुरूंदवाड येथेही उमटले. कोल्हापुरे याचे कुरुंदवाड येथील स्टेशनरी आणि सौंदर्यप्रसाधनालय यांच्या दुकानाची जमावाने तोडफोड केली. त्यामुळे दोन्ही दुकानांची मिळून लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे.
४. पोलीस अधिकार्यांनी दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
५. नृसिंहवाडी येथील कोल्हापुरे याच्या दुकानासमोर तणाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांनी जमाव पांगवण्यास पोलिसांना सहकार्य केले.
६. मोहसीन याच्या गौरवाड येथील घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता तरुण आणि नागरिक यांना शांत रहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
७. ४ ऑक्टोबर या दिवशी नृसिंहवाडी येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांनी हिंदुत्ववादी आणि नागरिक यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर जाधव यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी आणि पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांची भेट घेऊन घटनेविषयी चर्चा केली. दिनेश बारी म्हणाले की, या घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. ही घटना निंदनीय आहे. आम्हीही देशप्रेमी आहोत. दोषीवर कठोर कारवाई केली जाईल.
देशद्रोही मोहसीन कोल्हापुरे याच्यावर कठोर कारवाई करा ! – बजरंग दलाचे निवेदन
शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथील मोहसीन कोल्हापुरे याने सामाजिक संकेतस्थळाद्वारे तिरंगा ध्वजाविषयी अपमानस्पद छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोह केल्याच्या प्रकरणी कडक कारवाई करून त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावे. त्याच्या पाठीशी असणार्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावरही तात्काळ कडक कारवाई करावी, असे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे त्याचा व्यवसाय होता. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी जाणीवपूर्वक आकस ठेवून ही कृती केली आहे, याचाही तपास व्हावा, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे. या वेळी बजरंग दल सहसंयोजक श्री. संतोष कोळी उपाख्य बाळ महाराज, विहिंप जिल्हामंत्री श्री. शिवप्रसाद व्यास, बजरंग दल सहसंयोजक श्री. संतोष हत्तीकर, सर्वश्री शुभम कुंभोजे, वैभव फडणीस यांसह अन्य उपस्थित होते.
मोहसीनचे वकीलपत्र घेऊ नये – हिंदुत्वनिष्ठांची बार असोसिएशनकडे मागणी
या वेळी तेथील हिंदुत्ववाद्यांनी कुरुंदवाड येथील कोणत्याही अधिवक्त्यांनी मोहसीनचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी बार असोसिएशनकडे केली आहे. याला अधिवक्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याचे वकीलपत्र कुणीही घेतले नाही. (असे देशप्रेमी अधिवक्ते सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मोहसीन कोल्हापुरे याची धिंड काढून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – मुरलीधर जाधव, जिल्हाप्रमुख, शिवसेना
भारत देशात राहून पाकचे कौतुक करणे, हे शिवसेनेला कधीही सहन होणार नाही. वर्ष २००५ मध्ये नृसिंहवाडीजवळील औरवाड, गौरवाड आणि बसवाड येथे बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास आले होते. हा हिंदूंना मोठा धोका आहे. त्यामुळे या गावांची पोलिसांनी पुन्हा पडताळणी करावी. या गावात बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ सहस्र रुपये भाडे देऊन घुसखोर येथे रहातात. कोल्हापुरे याची गावातून धिंड काढून त्याच्यावर अजामीनपात्र देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात