Menu Close

मुंबई येथे रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती !

एक भारत अभियान – काश्मिर की ओर चळवळ

mumbai_pathnatya1

मुंबई : काश्मीरमधील विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन करून त्यांचा आवाज बळकट करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करून या चळवळीविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या पथनाट्यामध्ये सौ. नयना भगत, कु. शिवानी कीर, सर्वश्री संदीप गवंडी, संकेत काणेकर, श्री. सदानंद पांचाळ, भूषण देवरूखकर, संदीप धामणे, हेमंत पुजारी, नीलेश पवार, गणेश दुखंडे हे सहभागी झाले होते.

mumbai_pathnatya320

चिंचपोकळी रंगारी बदक चाळ येथील समर्थ हनुमान नवरात्रोत्सव मंडळ, पत्रा चाळ येथील बालवीर नवरात्रोत्सव मंडळ आणि दादर (पूर्व) येथील नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ येथे पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण सादर करण्यात आले.

पथनाट्यामधून काश्मीरमध्ये वाढत चाललेला देशद्रोह आणि महिलांवर वाढत चाललेले अत्याचार यांविषयी प्रबोधन करण्यात आले. या वेळी सादर करण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सर्वांना स्वत:च्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे आवाहन करण्यात आले.

या सर्व ठिकाणी मिळून १५० हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यात महिला अन् युवकांची संख्या अधिक होती. या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उत्तम सहकार्य लाभले. अनेकांनी या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात अनेक नवरात्रोत्सव मंडळांच्या मागणीनुसार नवरात्रोत्सवकाळात दसर्‍यापर्यंत ही प्रबोधनपर पथनाट्ये आणि स्वसंरक्षण प्रात्याक्षिके सादर करण्यात येणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *