धारवाड (कर्नाटक) : येथील कृषीविज्ञान विद्यापिठाच्या इमारतीमध्ये भरलेल्या कृषी मेळ्याच्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मग्रथांची विक्री करणार्यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले. या प्रकरणी पोलिसांनी श्रीराम सेनेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. (श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करणारे पोलीस ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
कृषी मेळ्याच्या समारोप कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करण्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या विक्री केंद्रावरील कार्यकर्ते बायबलची विक्री करतांना धर्मांतराचा प्रयत्न करत होते, असा आरोप श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. कृषी मेळ्यातील हे धार्मिक केंद्र बंद करावे आणि त्यातील धर्मप्रसारकांनी विद्यापिठाच्या परिसरातून बाहेर जावे, अशी मागणी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात