बेंगळुरू (कर्नाटक) : तरुणींनी एेतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे लढा दिला पाहिजे. कित्तुरूची राणी चन्नम्मा, झांसीची राणी लक्ष्मीबाई, केलादी चन्नम्मा, राणी अब्बाक्का आणि बेलवाडी मल्लम्मा यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू समन्वयक कु. भव्या गौडा यांनी केले. युवतींमध्ये क्षात्रतेज वृद्धींगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी चंदपूर येथील छाया अन्नपुर्णेश्वरी कल्याण मंडपामध्ये कन्या युवा शौर्य अभियानचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बेंगळुरू समन्वयक श्री. मोहन गौडा उपस्थित होते.
या वेळी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व विषद करतांना श्री. मोहन गौडा म्हणाले, हिंदु मुलींना प्रेमाचे आमीष दाखवून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवले जात आहे. लव्ह जिहादचे हे संकट ओळखून हिंदु महिलांनी सावध झाले पाहिजे.
क्षणचित्रे :
१. उपस्थितांपैकी दोघांनी हिंदु जनजागृती समितीच्या चंदपूर येथील धर्मजागृती सभेच्या प्रचारामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
२. उपस्थितांपैकी काहींनी २ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची विनंती केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात