महाराणा प्रताप बटालियनकडून गांधी जयंती ‘काळा दिवस’ म्हणून साजरी !
नवी मुंबई : वर्ष २००८ पासून ‘महाराणा प्रताप बटालियन’च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून ‘काळा दिवस’ मानला जातो. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव या देशप्रेमींना फासावर चढवण्याची मागणी इंग्रजांनी केली. त्याला गांधींनी अनुमती दिली होती. त्यामुळे या क्रांतीकारकांना फासावर जावे लागले. गांधींमुळे देशाची फाळणी झाली. त्या वेळी पाकमध्ये ३० लाख हिंदूंची हत्या करण्यात आली. या सगळ्याला गांधीच उत्तरदायी आहेत, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी केले. येथील पृथ्वी हॉलमध्ये महाराणा प्रताप बटालियनद्वारे गांधी जयंती हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात गांधी यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. या वेळी हिंदु राष्ट्र सेना, शिवसेना, बजरंग दल, विहिंप, लष्कर-ए-हिंद यांचेही कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे :
१. या कार्यक्रमाला पुष्कळ पोलिसांचा बंदोबस्त होता. जणूकाही संचारबंदी घोषित केल्यासारखीच स्थिती होती. अनेकांना पोलिसांनी या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखले.
२. या कार्यक्रमामुळे मुंबईतील सर्वच गांधी पुतळ्यांभोवतीही विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. अजयसिंह सेंगर यांना पोलिसांनी गांधी पुतळ्याकडे जाण्यापासून रोखले. या वेळी पोलिसांनी त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात