धर्मांधांकडून वारंवार होणारे हिंदूंच्या देवतांचे विटंबनेचे प्रकार थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
-
पोलिसांकडून गुन्हा प्रविष्ट
-
धर्मांध मतीमंद असल्याचा मुसलमानांचा कांगावा
पुणे – ऐन नवरात्रोत्सवामध्ये येथील लोहियानगर भागातील जय तुळजाभवानी मित्रमंडळाच्या देवीच्या मूर्तीची धर्मांध सय्यद परवेज सय्यद गुलाम नबी (वय १९ वर्षे) याने ५ ऑक्टोबरला रात्री विटंबना केली. हे कळताच स्थानिक धर्माभिमानी हिंदु भाविक मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी धर्मांधाला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
प्रारंभी स्थानिक धर्मांधांनी देवीच्या मूर्तीची विटंबना करणारा युवक मतीमंद, तसेच नशेत असल्याचा कांगावा केला; मात्र हिंदूंनी या प्रकरणी संघटित होऊन पोलिसांना गुन्हा प्रविष्ट करण्यास भाग पाडले.
रात्री उशिरा शेकडो हिंदू पोलीस ठाण्यानजीक एकत्र जमले होते. या प्रकरणी या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
१. ५ ऑक्टोबरला रात्री ८.३० ते ९ च्या काळात मंडळाचे कार्यकर्ते फराळ करण्यासाठी घरी गेले. ती वेळ साधून धर्मांध सय्यद देवीच्या मंडपामध्ये चढला.
२. त्याने देवीच्या अंगावर असलेले दागिने हिसकावून काढले. देवीच्या मूर्तीच्या हातात असलेला त्रिशूळ काढून घेतला.
३. हे पाहून स्थानिक हिंदू धावून आले आणि त्यांनी देवीच्या मूर्तीवर लाथ मारण्यासाठी निघालेल्या सय्यदला पकडून चोप दिला. त्याला पोलिसांनी पकडून नेल्यावर बहुसंख्येने जमलेल्या भाविकांनी देवीची महाआरती केली.
स्थानिक पोलीस अधिकार्याकडून हिंदूंवर अरेरावी !
यंदाच्या नवरात्रीमध्येच लोहियानगर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकार्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अरेरावी करत रात्री ९.४५ वाजताच दांडियाचा कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. गणेशोत्सवाच्या वेळीही एका गणेश मंडळाच्या पदाधिकार्याला त्यांची चूक नसतांना दटावण्यात आले. गणेश मंडळाच्या वतीने ज्या ठिकाणी मंडप उभारण्यात येणार होता, त्याच ठिकाणी एका मुसलमानाने गॅरेज उघडले होते. त्या ठिकाणी गणेश मंडळाचा मंडप घालण्यावरून पोलिसांनी दटावणी केली होती. अरेरावी करणार्या पोलीस अधिकार्याचे स्थानांतर करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. (हिंदूंना, तुम्हाला नाहक त्रास देणार्या अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा ! हिंदूंना नाहक त्रास देणार्या पोलीस अधिकार्याचे स्थानांतर केल्यास असे अधिकारी दुसरीकडे जाऊन तेथील हिंदूंनाही असाच त्रास देतील. त्यामुळे स्थानांतराची मागणी करण्याऐवजी अशा हिंदुद्वेषी पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी आवाज उठवायला हवा. तरच हिंदूंना नाहक त्रास देणार्या पोलिसांवर जरब बसेल ! – संपादक)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात