Menu Close

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

wardha

वर्धा – येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते. बंगाल राज्यात ४ वर्षे श्री दुर्गादेवी पूजेला अनुमती नाकारून देवीभक्तांना पूजेपासून वंचित ठेवणार्‍यांच्या विरोधात ठोस अन् कठोर कारवाई करावी, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले. या आंदोलनात गुरुदेव सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचेही कार्यकर्ते सहभागी झाले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. रत्ना हस्ती आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मंदा डगवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

क्षणचित्र – गुरुदेव सेवा समितीचे डॉ. ऐरकेवार आंदोलनातील घोषणा ऐकून आंदोलनात सहभागी झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *