Menu Close

धर्मांधांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी करू नये, यासाठी त्यांच्या वाढत्या लोकसंख्येला आवर घालणे आवश्यक ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

डावीकडून सौ. नंदिनी सुर्वे, डॉ. उपेंद्र डहाके (दीपप्रज्वलन करतांना) आणि श्री. नरेंद्र सुर्वे

वशेणी (रायगड) : ख्रिस्ती मिशनरी आदिवासी पाड्यांत जाऊन लोकांना फसवून आणि आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात. धर्मांध लव्ह जिहादमध्येही हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याशी लग्न करतात. त्या माध्यमातून संतती निर्माण करून देशातील मुसलमानांची लोकसंख्या वाढवतात. त्यामुळे आज भारतातील मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. हे जर आपण वेळीच रोखले नाही, तर धर्मांध पुन्हा एकदा भारतापासून वेगळ्या राष्ट्राची मागणी करतील, असे प्रतिपादन डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले. ते येथे ३ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. रायगड जिल्ह्यात झालेली ही तिसरी सभा होती. या सभेला २५० हून अधिक जणांची उपस्थिती लाभली. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी सुर्वे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.

मान्यवरांचे विचार

धर्मशास्त्रानुसार कृती करणेच हितावह ! – सौ. नंदिनी सुर्वे

शनिशिंगणापूर प्रकरणात प्रसिद्धीमाध्यमे आणि पुरोगामी अन् महिला संघटना यांनी विरोध केला; मात्र धर्म न मानणार्‍यांनी सामाजिक दृष्टीकोनातून या विषयाची चिकित्सा करणे चुकीचे आहे. त्यामुळे धर्मशास्त्र समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे, हेच आपल्या सर्वांसाठी हितकारक आहे.

तरुणांनो, आजच जागृत व्हा ! – श्री. नरेंद्र सुर्वे

आज संपूर्ण जगासमोर ‘इस्लामिक स्टेट’ चे मोठे संकट आहे. असे असतांना आज आपल्या हिंदु तरुणांच्या हातात मात्र मद्याची बाटली आणि क्रिकेटची बॅट आहे. धर्म टिकल्यासच राष्ट्र टिकेल, राष्ट्र टिकल्यास समाज अन् समाज टिकल्यास आपण सुरक्षित राहू. त्यामुळे तरुणांनो, आजच जागृत व्हा !

क्षणचित्रे

१. सभेनंतर अनेकांनी वक्त्यांशी चर्चा केली.
२. काही जणांनी वशेणी गावाच्या आजूबाजूला होणार्‍या धर्मांतराविषयी माहिती देऊन ते थांबवण्यासाठी साहाय्य मागितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *