Menu Close

धर्मांधांच्या वाढत्या संख्येमुळे काश्मीर आणि उत्तरप्रदेश येथील हिंदूंप्रमाणे पुणे येथेही एका भागातील हिंदूंचे स्थलांतर !

musalmanaवर्ष १९९० च्या दशकात काश्मीरमधून लक्षावधी काश्मिरी हिंदूंना धर्मांधांनी देशोधडीला लावले. ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला, संपत्तीपेक्षाही ज्यांनी आपल्या घरातील स्त्रियांच्या रक्षणाला प्रधान मानले, त्या धर्मनिष्ठ काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडावे लागले. हे काही एका रात्रीतील स्थलांतर नव्हते. या षड्यंत्राचा प्रारंभ त्याच्या कितीतरी वर्षे आधी झाला होता. वेगवेगळ्या घटनांमधून धोक्याची घंटा वाजत होती; पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नाही. जेव्हा लक्षात आले, तेव्हा हक्कांसाठी लढत बसायचे कि आधी जीव वाचवायचा, हा प्रश्‍न समोर उभा राहिला होता. अशीच स्थिती नुकतीच उत्तरप्रदेशमधील कैरानामध्येही निर्माण झाली. एकेकाळी हिंदूबहुल असणार्‍या त्या गावात हिंदू अल्पसंख्य झाले. प्रकाशझोतात आलेली काश्मीर आणि कैराना ही दोनच नावे ! भारतातील कित्येक गावे, शहरे काश्मीर आणि कैरानाच्या मार्गावर आहेत; परंतु आजही हिंदू जागे होत नाहीत, हे दुर्दैव ! त्यातच आता पुण्यासारख्या शहराची भर पडत आहे. या लेखातील धर्मांधांची उद्दामगिरी वाचून हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता प्रतिपादित होईल. त्यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन उभारणे आवश्यक आहे.

आणखी एक शहर..!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिथे स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतीकारकांची जी कर्मभूमी ते पुणे शहर.. त्या पुणे शहराचीही वाटचाल काश्मीर, कैरानाच्या दिशेने होत आहे. शहरातील एका भागात असलेले हिंदू आज दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. काही जण बायका-मुलांच्या काळजीपोटी घरे सोडून जात आहेत. काहींनी त्यांच्या मुलींना शाळा-महाविद्यालयांत पाठवणेही बंद केले आहे. हिंदूंचे सण साजरे करणे बंद झाले आहे, तर कुरापती काढून भांडणे करणार्‍या धर्मांधांपासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांना खेळायला बाहेर सोडण्याचीही हिंदु पालकांना भीती वाटत आहे.

एकेकाळच्या हिंदूबहुल भागात धर्मांधांचे वाढते प्रमाण !

एकेकाळी हिंदुबहुल असणार्‍या भागात एकेक करून धर्मांधांची वस्ती वाढू लागली आणि तिथला बकालपणा ! जन्मापासून तिथे रहाणारे काही स्थानिक आजही जुन्या आठवणीत रमतात आणि परिसराला आज आलेल्या झोपडपट्टीच्या रूपाविषयी हळहळतात. आजमितीला त्या परिसरात ५० टक्के धर्मांध आहेत.

शिवजयंती हळूहळू बंदच !

स्थानिक सांगतात की, पूर्वी परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होत असे. सकाळपासून पोवाडे आणि परिसरात भगवे ध्वज असे वातावरण असायचे. आता आम्हीच पोवाडे विसरलो. आमच्या मुलांना तर पोवाडे ठाऊकही नाहीत. पोलीस येतात आणि पोवाडे बंद करून जातात. अवघ्या १ ते २ ठिकाणी शिवजयंती साजरी होते. त्यातही पूर्वीसारखा उत्साह नसतो. शिवजयंती झाली की, पोलीस भगवे ध्वज रात्रीच्या वेळी काढायला सांगतात. हिंदू झोपलेले असतील, तर झोपेतून उठवून पोलीस हिंदूंना ध्वज काढायला सांगतात; परंतु धर्मांधांनी लावलेले हिरवे ध्वज मात्र रंग जाईपर्यंत काढले जात नाहीत. आजही त्या परिसरात प्रवेश करतांनाच दिसणार्‍या हिरव्या ध्वजांची संख्या लक्ष वेधून घेते.

ईदच्या कालावधीमध्ये धर्मांध युवक त्या भागातील मंदिरावर बूट घालून चढतात आणि हिरवे ध्वज अन् फलक लावतात. (धर्मांधांच्या श्रद्धास्थानांचा एखाद्या हिंदूने अवमान केला असता, तर धर्मांधांनी दंगल पेटवली असती. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण होण्यासाठी आणि त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्य) आवश्यक आहे, हेच स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या वेळी हिंदू काही प्रतिकार करू शकत नाहीत; कारण त्यांच्या रक्षणाला ना पोलीस, ना राजकारणी आहेत आणि संघटनही नाही, प्रतिकाराचे बळही नाही. अशा दयनीय स्थितीत आज त्या भागातील हिंदू जीवन जगत आहेत. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही. अन्यथा काही दिवसांनी हिंदू म्हणून घेण्यासही कोणी शिल्लक रहाणार नाहीत.

टिळा लावणे सोडले, सणही घराच्या आतच साजरे !

धर्मांधांच्या भीतीपोटी स्थानिक हिंदूंनी कपाळावर टिळा लावणेही बंद केले आहे. पूर्वी हिंदु स्त्रिया नागपंचमी, दिवाळी, वटपौर्णिमा आदी सणांच्या दिवशी बाहेर पडायच्या; परंतु आता दर २-४ पावलांवर धर्मांधांची टोळकी असतात. त्यांच्याकडून होणारी छेडछाड, अश्‍लील शेरेबाजी यामुळे हिंदु स्त्रियांचे सणही घरातच साजरे होऊ लागले आहेत.

लव्ह जिहाद फोफावतोय !

या परिसरात आजवर लव्ह जिहादच्या अनेक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत अशा किमान १५ घटनांची माहिती स्थानिकांना आहे. आणखीही अशा हिंदु मुली गेल्याची शक्यता असल्याचे स्थानिक सांगतात. लव्ह जिहादच्या जाळ्यात अल्पवयीन मुलींपासून ते विवाहित हिंदु स्त्रियाही अडकल्या आहेत. अशाच एका प्रकरणात एका मुलीला एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या आणि आध्यात्मिक संस्थेच्या साहाय्याने सोडवून आणण्यात आले.

१. हिंदु मुलगी आणि महिला दिसायला कितीही कुरूप असली, तरी तिला फसवायचे. येथील ३५ वर्षांची एक महिला त्या भागातील एका धर्मांधासमवेत पळून गेली. घरात नवर्‍याकडून होणारी मारहाण आणि त्या कालावधीत धर्मांध पुरुष तिची विचारपूस करायचे अन् त्या महिलेला मानसिक आधार द्यायचे. (धर्मांधांची क्लृप्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्मांधांनी तिच्या घरच्या परिस्थितीचा लाभ घेतला. महिला स्वतःची मोठी मुले सोडून धर्मांधासमवेत पसार झाली.

२. त्या भागामध्ये अगदी १२ – १३ वर्षांच्या मुलींनाही धर्मांध फसवत आहेत. त्या मुलींना फसवण्यासाठी वा लव्ह जिहादसाठी त्या धर्मांधांची अल्पवयीन मुलेही तसेच काम करत आहेत.

३. विवाह ठरलेल्या एका युवतीला तेथील धर्मांधांनी पळवून नेले. त्यानंतर ४ धर्मांध प्रतिदिन मुलीच्या घरासमोर दहशत निर्माण करण्यासाठी उभे रहायचे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने मुलीचा शोध घेतल्यावर ती सापडली. तोपर्यंत तिच्यावर त्या धर्मांधाने अत्याचारही केले होते.

४. तेथे मुलींची सर्रास छेड काढली जाते. तेथील सामूहिक शौचालयामध्ये कोणतीही आई आपल्या मुलीला एकटी पाठवू शकत नाही; कारण आईला असे वाटते की, कधी एखादा धर्मांध दार ढकलून आत येईल, हे सांगू शकत नाही.

पोलिसांचे साहाय्य मागणार्‍या हिंदूलाच पोलीसांनी खोट्या गुन्ह्याखाली अडकवले !

एकदा हिंदू आणि धर्मांध यांच्यात झालेल्या वादाची कल्पना एका हिंदूने लगेचच पोलिसांना दिली आणि त्यांचे साहाय्य मागितले. पोलिसांनी ते दायित्व अन्य पोलिसांवर ढकलल्याने तो हिंदू त्या संदर्भात विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्याच्या कलमांखाली अडकवले. अखेर त्या हिंदूला स्वतःच जामीन देऊन बाहेर यावे लागले. एका घटनेत तर पोलिसांसमोरच हिंदूला झालेल्या मारहाणीत पोलीस ठाण्याच्या भिंती या रक्ताने माखलेल्या होत्या.

दडपणाखाली पोलीस !

त्या परिसरात काही घटना घडल्यास आणि पोलिसांपर्यंत प्रकरण गेल्यास अवघ्या काही मिनिटांतच शेकडो मुसलमानांचा जमाव जमतो आणि पोलिसांवर दडपण आणले जाते. (हिंदूंवर आपली दादागिरी करणारे पोलीस अशा वेळी मूग गिळून गप्प का बसतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) काही अनुचित घडू नये, यासाठी पोलीसही प्रकरणाच्या मुळाशी जात नाहीत.

आजही स्थानिक हिंदूंच्या डोळ्यांत पाणी आणणारी वर्ष २००१ ची दंगल !

त्या परिसरामधील अनेक पुरातन आणि जुनी मंदिरे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्ष २००१ मध्ये तेथे मोठी दंगल झाली. दंगलीच्या आठवणी आजही तेथील हिंदूंच्या मनात ताज्या आहेत. दंगल होण्यामागचे कारण काय, तर होळी चालू असतांना त्यात एका धर्मांधाने लहान मुलाला त्यात थुंकण्यास सांगितले. त्यावरून ही दंगल पेटली. दंगलीत श्री गणपति आणि श्री दुर्गादेवी यांच्या मूर्ती अश्‍लाघ्य शिव्या देत फोडल्या. देवीच्या शरिरावर आणि मर्मांगावर तलवारीने वार केले. त्या वेळी अनेक धर्मांध महिला घरात लपवून ठेवलेली शस्त्रे त्यांच्या मुलांना दंगलीच्या वेळेस पुरवायच्या. तेथील बर्‍याच धर्मांध महिला आणि लहान मुले यांना दंगलीपूर्वी सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले होते. आजही हा प्रसंग सांगतांना स्थानिकांचे डोळे पाणावतात. दंगलीनंतर कित्येक दिवस हिंदू गटागटाने फिरत होते. तेव्हा ते हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन ये-जा करायचे.
अन्य एका प्रसंगात एका स्थानिक महिलेने सांगितले की, पवित्र रोजाच्या मासात मुद्दामहून हिंदु मुलांशी भांडणे उकरून काढली जातात. ते प्रतिदिन एका हिंदु मुलाला मारहाण करता, अश्‍लील शिव्या देतात आणि आजचा रोजा सफल झाला, असे तेथील धर्मांध युवक म्हणतात.

हिंदु मुलाला शाळा सोडावी लागली !

घराशेजारीच मदरशाचे बांधकाम करण्यास प्रारंभी एका हिंदूने विरोध केला; परंतु तरीही तेथे मदरसा निर्माण झाला. हळूहळू शेड टाकून परिसराचा विस्तार करण्यात आला. घरासमोरून धर्मांधांची वर्दळ वाढली, तसे त्या हिंदूने मुलांच्या काळजीने रहाते घर सोडले आणि तो दुसरीकडे स्थायिक झाला. त्यांचा मुलगा अभ्यासात हुशार होता. सध्याच्या शाळेपासून नवीन घर दूर असल्याने त्याने शाळा सोडण्यासाठी शाळेत आवेदन केले. तेव्हा शाळेने त्याला आणण्या-नेण्याच्या व्यवस्थेची सिद्धता दर्शवली; परंतु शाळा लांब पडत असल्याने शेवटी मुलाने शाळा सोडली.
काही धर्मांध युवक हिंदु मुलांना व्यसनाच्या आहारी लावतात. तसेच हिंदु मुलांमध्ये भांडणे लावून देतात.

हिंदु व्यापार्‍यांची दुकाने बंद पाडतात !

हिंदु व्यापार्‍यांची दुकाने बंद पाडण्याचे प्रकारही येथे घडतात. दुकानाच्या बाहेर धर्मांध गटागटाने उभे रहातात. दुकानात येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, त्यांच्याशी अश्‍लील स्वरूपात बोलणे असा त्रास दिला जातो. हळूहळू त्या दुकानात ग्राहकांचे येणे न्यून होते आणि हिंदु व्यापार्‍यावर दुकान बंद करण्याची नामुष्की ओढवते.

हिंदूंना भरवशाचे राजकीय नेतृत्व नाही !

हिंदूंना परिसरात भरवशाचे राजकीय नेतृत्व नाही. एका नगरसेवकाचीच नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात गुंड अशी आहे. हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. हिंदूंचीच मते मोजक्या २-३ पक्षांमध्ये विभागलेली आहेत. स्थानिक हिंदु राजकारण्यांना हिंदुत्वनिष्ठ पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते मजलिस-ए-इत्तेहाद-उल्-मुस्लिमीन (एम्आयएम्) या पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणुकीला उभे रहाणार असल्याची चर्चा चालू आहे. त्या भागात एम्आयएम् पक्षाने हात-पाय पसरण्यास प्रारंभ केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *