Menu Close

हिंदूंच्या होणार्‍या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना ! – प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना

pradeep_jaiswalसंभाजीनगर – हिंदूंचे सण आणि उत्सव यांच्यावर शासन आणि न्यायव्यवस्था यांच्याकडून जाचक नियमांचा फास आवळून निर्बंध घातले जातात. हिंदूंच्या सणांवरच निर्बंध का ? हिंदूंच्या या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री. प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…

१. प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्याचा मार्ग अवलंबण्यासमवेत या गळचेपीचा निषेध करण्यासाठी मंचच्या माध्यमातून हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला जाईल.

२. हिंदूंनी सण-उत्सव भारतात नाही साजरे करायचे, तर काय पाकिस्तानात साजरे करायचे का ?

३. हिंदु एकता मंचच्या व्यासपिठावर सर्व हिंदु समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र यावे. लवकरच यासंदर्भात बैठक घेण्यात येईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *