Menu Close

मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी भरणार्‍या चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

मुंबई – वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अँड प्रमोशन लि. या आस्थापनाच्या वतीने मुंबई येथे १५ ऑक्टोबर या दिवशी चिनी उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रचार साहित्य वाचून तसेच या प्रदर्शनाविरुद्ध आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने या प्रदर्शनास विरोध करण्याचा निर्णय घेतला. समितीने म्हटले आहे की, चीन हा देश भारताचा चांगला शेजारी कधीच नव्हता. चीनला आशियात पाळेमुळे रोवायची आहेत. दक्षिण चीन सागरात चीनने चालवलेली दादागिरी याची साक्ष आहे.

चीनने भारताच्या अणूपुरवठादार देशांच्या गटातील प्रवेशाला कडाडून विरोध केला. तसेच जैश-ए- महंमदचा प्रमुख मसूद अझर याला राष्ट्रसंघाने आतंकवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला सुरक्षा परिषदेतील १५ पैकी १४ राष्ट्रांचा पाठिंबा असूनही एकट्या चीनने हा प्रस्ताव राखून ठेवला. तसेच भारतावर नेहमी आक्रमण करणार्‍या पाकला चीन समर्थन देत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित करणे, भारतियांच्या देशप्रेमाला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे आहे. तरी समिती वर्ल्डेक्स इंडिया एक्झिबिशन अ‍ॅण्ड प्रमोशन लि. या आस्थापनाला वरील प्रदर्शन रहित करण्याचे आवाहन करत आहे.

देशप्रेमी नागरिक पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.

इमेल : [email protected][email protected]

दू.क्र. (मुंबई) : (०२२) ४०३७६७००-३०, २४९४४६७२/७३

देहली : (०११) ४१८०२०३३ / २६२८५१४२

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *