-
पथनाट्याच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम बनण्याचा संदेश
-
काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ कृतीशील योगदान देण्यासाठी साद
पुणे – येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत रणरागिणी शाखेच्या वतीने सादर केलेल्या पथनाट्यानंतर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता या विषयावरील मार्गदर्शन पार पडल्यावर एक भारत अभियानांतर्गत येथील रमणबाग शाळेच्या मैदानावर होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचाही प्रसार करण्यात येत आहे. काश्मिरी हिंदूंना वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादामुळे सर्व संपत्ती तेथेच सोडून काश्मिरमधून पलायन करावे लागले. २६ वर्षे त्यांच्यावर आपल्याच देशात निर्वासितासारखे जीवन वाट्याला आले आहे. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे हा प्रश्न अजूनही तसाच आहे. काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे हे देशभरातील धर्मबांधवांचे कर्तव्यच आहे, असे आवाहन करत छोट्या व्याख्यानाच्या माध्यमातून हिंदु धर्मजागृती सभेचाही प्रसार करण्यात येत आहे. नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांसह उपस्थित भाविकांचा दोन्ही विषयांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
आतापर्यंत सांगवी येथील सेवा मित्र मंडळ, चिंचवड येथील अखिल चिंचवड नवरात्री महोत्सव, कसबा पेठ येथील शितळा देवी मंडळ, शिवाजी रस्ता येथील गणराज मित्रमंडळ, नाना पेठ येथील यंग भोरडे आळी मित्रमंडळ, घोरपडी येथील अखिल मित्रमंडळ, सुखसागरनगर येथील सूर्यमुखी दत्त मंदिर आदी ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
क्षणचित्रे
१. घोरपडी येथील अखिल मित्रमंडळामध्ये सादर करण्यात आलेल्या पथनाट्यासाठी जवळपास ३०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष ए.के. मिश्रा यांनी समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील संकटांचा विचार करून स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा विषय हाताळल्याचे सांगितले. हा उपक्रम चालू करणार्यांनी या उपक्रमामागे एक महान दृष्टीकोन ठेवल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. राजेश्वरी संस्थेच्या अधिवक्ता निवेदिता बडदे यांचा पथनाट्याचे आयोजन करण्यामध्ये पुढाकार होता.
२. काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा विषय ऐकून घोरपडी येथे एका निवृत्त लष्करी अधिकार्यांनी व्यासपिठावर येऊन समितीच्या कार्यकर्त्यांना सभेचा विषय पुन्हा मांडण्यास सांगितले, तसेच समिती करत असलेल्या कार्याविषयी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
३. श्री. गिरीश टोलीवाल या धर्मप्रेमी व्यक्तीने समितीच्या कार्यकर्त्यांकडे धर्मकार्याचे कौतुक करत तुम्हाला या परिसरात रात्री-अपरात्री केव्हाही साहाय्य लागले, तरी आवर्जून सांगा, असे सांगत समितीला पाठिंबा व्यक्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात