सातासमुद्रापलीकडे पोचलेले हिंदु संस्कृतीचे महत्त्व !
न्यूयॉर्क – अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस आणि दिवाळी स्टँप प्रोजेक्ट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या तिकिटावर पारंपरिक दीप आणि त्याच्या समोर गुलाबाच्या पाकळ्यांची जोडी दाखवण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराचे लेखा अधिकारी स्कॉट स्ट्रिन्जर यांनी दिवाळी टपाल तिकिटाची घोषणा केली. अमेरिकेतील भारतीय राजदूत रिवा गांगुली दास यांनी भारतीय समाजाची मागणी मान्य केल्याविषयी युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसचे आभार मानले. दिवाळी पोस्टल स्टँप प्रोजेक्टच्या अध्यक्ष रंजु बत्रा यांनी सदर प्रकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात