हिंदूंनो, विजयोपासनेला आरंभ करा !
शुंभ, निशुंभ, महिषासुरादी प्रबल दैत्यांवर महादुर्गेने आणि अहंकारी रावणावर श्रीरामाने विजय मिळवला, तो दिवस म्हणजे विजयादशमी ! दसरा म्हणजे केवळ हिंदु देवतांच्या विजयाचे स्मरण करण्याचा सण नव्हे, तर विजिगीषू वृत्तीचे संवर्धन करण्याचा दिवस आहे; म्हणूनच या दिवशी राक्षसी प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हिंदु धर्मात विजयोपासना सांगितली आहे. शत्रूंपासून अजिंक्य रहाण्यासाठी अपराजिता देवीचे पूजन, शस्त्रे शत्रूंचा संहार करतात म्हणून शस्त्रपूजन आणि नंतर प्रत्यक्ष शत्रूच्या पराभवासाठी सीमोल्लंघन करणे, या कृती दसर्याला केल्या जातात.
आज या विजयोपासनेचे विस्मरण झाल्याने सर्वत्र हिंदू पराभूत होत आहेत. युद्धाचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे विजय ! विश्वात पराभवासाठी एकही युद्ध होत नाही. हिंदूंनो, विजयाचे हे माहात्म्य आणि विजयादशमीच्या विजयोपासनेचे महत्त्व लक्षात घ्या ! केवळ कर्मकांड म्हणून विजयादशमीला विजयोपासना करू नका, तर या वर्षीपासून सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील भ्रष्टाचारादी दुष्प्रवृत्तींच्या निवारणार्थ खर्या विजयोपासनेला आरंभ करा !
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (१०.९.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात