-
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !
-
मंदिरात नैवेद्य बनवण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असेल, तर त्या मंदिरातील इतर कारभार कसा केला जात असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
-
ही परिस्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वाराणसी : काशी विश्वनाथ मंदिरात दाखवण्यात येणार्या नैवेद्यात भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे. नेवैद्यासाठी मागवण्यात येणार्या दुधात पाणी मिसळण्यात येत असून नैवेद्यासाठी उच्च दर्जाच्या तांदुळाऐवजी किरकोळ दर्जाचा तांदूळ वापरण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या अन्वेषणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा भ्रष्टाचार पुन्हा केल्यास नोकरीवरून काढण्याची चेतावणी यासाठी उत्तरदायी मुख्य भंडार्यांना देण्यात आली आहे.
या संदर्भात तक्रार आल्यावर न्यास परिषदेेचे अध्यक्ष आचार्य पं. अशोक द्विवेदी यांनी भंडारगृहाचे निरीक्षण केले असतांना त्यांना हा भ्रष्टाचार आढळून आला. आचार्य पं. द्विवेदी म्हणाले, चौकशीच्या वेळी काही कर्मचार्यांकडून समजले की, प्रसादासाठी सुगंधित आणि उच्च प्रतीचा तांदूळ मागवला जातो; परंतु चांगला तांदूळ घरी पाठवून त्या जागेवर जाड्या तांदुळाचा नेवैद्य सिद्ध केला जातो. सायंकाळी खीर बनवण्यासाठी ११ लीटर दूध नियमितपणे एका दात्याकडून पाठवण्यात येते; परंतु या दुधातही पाणी मिसळले जात असल्याने त्याला चव रहात नसल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणाचा तपास केल्यावर काही भंडारीच यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे असा अपहार केल्याचे आढळून आल्यास यास उत्तरदायी मुख्य भंडारी ईश्वर देव मिश्र, अंशू मिश्र आणि दुर्गा मिश्र यांना नोकरीवरून काढून टाकण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
वर्ष १९८३ मध्ये काशी विश्वनाथ मंदिराचे सरकारीकरण करण्यात आले होते. या मंदिरात पूजा-आरती करण्याचा अधिकार महंतांना मिळावा, यासाठी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात