इंदौर (मध्यप्रदेश) – येत्या दोन मासांत दोन धर्मजागृती सभा, धर्माभिमान्यांशी संवाद सभा आणि धर्मशिक्षण वर्ग यांद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा निर्धार येथे ९ ऑक्टोबरला झालेल्या हिंदू संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. येथील आर्य समाज मंदिर येथे झालेल्या या बैठकीला ८ संघटनांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करून मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये धर्मजागृतीच्या दृष्टीने झालेल्या कार्याचा आढावा मांडला. त्यानंतर बैठकीला उपस्थित सर्वांनी इंदौर आणि आसपासच्या क्षेत्रात धर्मजागृती आणि धर्मरक्षणाच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येतील, यावर आपले विचार मांडले. या बैठकीत वैदिक उपासन पीठचे श्री. त्रिपुरारी शर्मा आणि हिंदू महासभेचे श्री. जितेंद्र ठाकूर यांनी धर्मजागृती सभेचे दायित्व घेतले असून अन्य सर्वांनी या सभांच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली आहे.
क्षणचित्रे
- बैठकीसाठी बहुतांशजण वेळेत उपस्थित होते.
- बैठकीचा प्रारंभ आणि शेवट प्रार्थना अन् श्लोकद्वारे देवतांना वंदन करून करण्यात आला.
- आर्य समाजाच्या सहयोगाने या बैठकीसाठी सभागृह उपलब्ध झाले.