Menu Close

मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रौत्सव मंडळांत प्रबोधनपर पथनाटये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके या माध्यमांतून जनजागृती !

एक भारत अभियान काश्मीर की ओर या अंतर्गत मुंबई येथे २१ ऑक्टोबरला होणार्‍या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन !

chinchpokali_navratri

मुंबई : मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आणि समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रौत्सव मोहिमे अंतर्गत चिंचपोकळी आणि दादर येथे २ अन् ३ ऑक्टोबरला विविध नवरात्रौत्सव मंडळांत प्रबोधनपर पथनाटये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके या माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. यावेळी रणरागिणी शाखेच्या वतीने सौ. नयना भगत यांनी उपस्थितांना नवरात्रौत्सवांमागील शास्त्र सांगून नवरात्रौत्सवांतील अपप्रकार रोखण्याविषयी प्रबोधन केले. तसेच एक भारत अभियान काश्मीर की ओर या अंतर्गत मुंबई येथे २१ ऑक्टोबरला होणार्‍या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.

dadar_navratri_pratekshik

चिंचपोकळी येथील समर्थ हनुमान नवरात्रौत्सव मंडळ, रंगारी बदक चाळ अन् बालवीर नवरात्रौत्सव मंडळ, पत्रा चाळ आणि नायगाव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, दादर (पू.) येथे काश्मीरमध्ये वाढत चाललेला देशद्रोह अन् महिलांवर वाढत चाललेले अत्याचार या विषयांवर ही प्रबोधनपर पथनाटये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके समितीच्या कार्यकर्त्यांनी सादर केली. याचा एकूण १५० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.

dadar_navratri

यात महिला अन् युवकांची संख्या लक्षणीय होती. या सर्व ठिकाणी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उत्तम सहकार्य लाभले. या सर्व मंडळांत या उपक्रमाला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. अनेकांनी या वेळी धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात अनेक नवरात्रौत्सव मंडळांच्या मागणीनुसार नवरात्रौत्सव काळात दसर्‍यापर्यंत ही प्रबोधनपर पथनाटये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके हिंदु जनजागृती समिती आणि समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने सादर करण्यात येणार आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *