Menu Close

धर्मांध युवकाकडून हिंदु मुलीचा विनयभंग आणि भावाला गंभीर मारहाण !

अडवाद (जिल्हा जळगाव) येथे ‘लव्ह जिहाद’ चालूच !

हिंदूंनो, किती दिवस तुमच्या कन्या आणि भगिनी यांना अशा प्रकारे लज्जित होण्याची वेळ आणणार आणि किती दिवस धर्मांधाच्या हातचा मार खात रहाणार, ते एकदाचे ठरवून टाका !

‘लव्ह जिहाद’ कुठे आहे म्हणणार्‍यांना अजून किती पुरावे हवेत ?

अडावद (जिल्हा जळगाव) – येथे एका हिंदु मुलीचा विनयभंग करून एका धर्मांध युवकाने तिच्या भावाला गंभीर मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबरला रात्री घडली. पोक्सा कलमाखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वडती येथील एका हिंदु युवतीचा (वय १७) जुबेद पिंजारी (वय १९) हा धर्मांध युवक २ महिन्यांपासून पाठलाग करून तिला त्रास देत होता आणि तिचा भ्रमणध्वनी मागत होता. ९ ऑक्टोबरला रात्री १० वाजता ही युवती तिच्या चुलत बहिणीसोबत घरी पायी जातांना वडती येथील मारुतीच्या मंदिराच्या समोरील चौकात धर्मांध जुबेद याने तिचा हात धरला आणि “माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला किती वेळा भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. तू मला भ्रमणध्वनी क्रमांक का देत नाहीस ? तू आता माझ्यासोबत चल”, असे म्हणून तिचा विनयभंग केला.

त्याच वेळी या युवतीचा चुलत भाऊ तेथे आला आणि त्याने जुबेद यास जाब विचारला. या वेळी झालेल्या झटापटीत जुबेदने त्याच्या खिशातील दारूची बाटली काढून तिच्या भावाच्या डोक्यावर मारली. त्यामुळे त्याचे डोके फुटून त्याला गंभीर दुखापत झाली. या युवतीच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भादवि कलम ३५४(अ)(ड)३२३,३२४,५०४ लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम कलम ७ चे (८)११(४)चे १२ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *