Menu Close

पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट न पहाण्याचा निर्धार करा ! – किरण दुसे, कोल्हापूर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव येथील राजहंस गडावर श्री दुर्गामाता दौडीचा सांगता समारंभ

kiran_dhuse
मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे, त्यांच्या मागे श्री. पंकज गांधी आणि श्री. कल्लाप्पा पाटील

बेळगाव – उरी आक्रमणानंतर भारतीय सैनिकांचा झालेला अवमान सहन केला जाणार नाही. सैनिकांना पाठिंबा दर्शवून त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे. आपण सर्वांनीच पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट पहायचे नाही, असा निर्धार करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. येथील राजहंस गडावर झालेल्या श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

शिवप्रतिष्ठानचे श्री. कल्लाप्पा पाटील यांनी सांगितले, संघटन चांगले होण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. दौडीच्या माध्यमातून ती आपण वाढवू शकतो. दौडीच्या माध्यमातून आपण राष्ट्र सुखी व्हावे, यासाठी एकप्रकारे कुलाचेच पालन करत आहे.
देसुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे नेते श्री. पंकज घाडी यांनी उपस्थितांचे कौतुक केले. अंतर्गत शत्रूंवर मात करण्यासाठी संघटित रहा, तसेच सर्व अपसमज दूर करून धर्मावर होणारे आघात आणि षड्यंत्र हाणून पाडा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाची सांगता दौडीसाठी पूजा केलेला भगवा ध्वज उतरवून झाली. दौडीच्या सांगतेसाठी नंदीहळळी गावातील युवकांनी पुढाकार घेतला होता. या वेळी नंदीहळ्ळी, राजहंस गड, देसूर, गर्लगुंजी, निडगळ, तोपिन कट्टी, नागेनहट्टी, नागुर्डा, सुळगे या गावांतून १ सहस्राहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी बेळवट्टी गावातील ग्रामस्थांच्या संघटनाचा आदर्श घ्या ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

manoj_khadye
मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

बेळवट्टी – येथील ग्रामस्थांचे सर्वच स्तरांवरील संघटन कौतुकास्पद आहे. ते सर्वजण कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटित होतात. असे संघटनच राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सर्वांनीच बेळवट्टी गावाचा आदर्श घेऊन संघटित व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. बेळवट्टी गावात झालेल्या श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या वेळी पुष्कळ ग्रामस्थ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *