देहली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
देहली – कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणार्या फटाक्यांवर बंदी आणावी, चिनी उत्पादने विशेषत: चिनी फटाके यांच्यावर बंदी घालावी आणि महिलांवर अत्याचार करणार्या बलात्कार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा, यांसाठी ९ ऑक्टोबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना नेपाली प्रकोष्ठ, भारत नेपाल हिंदू एकता परिषद्, भारतीय युवा शक्ती, वैदिक उपासना पीठ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटना आणि इंडियन पब्लिक स्कूल, सुलतानपुर (जिल्हा हिस्सार) चे विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी शिवसेना नेपाळी प्रकोष्ठचे देहली येथील प्रदेश संयोजक श्री महेंद्र के.सी. म्हणाले, फटाके फोडणे आमची संस्कृती नाही, ही तर पाश्चात्त्य विकृती आहे. हिंदूंनी अशा प्रकारे धार्मिक उत्सव साजरा करू नये. भारतीय युवा शक्ती, मुंबईचे श्री. वासु गायकवाड म्हणाले, भारतातील सेक्युलर लोक दुसर्यांनाही त्यांच्यासारखे करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी अतिशय हानीकारक आहे. त्यामुळेच आपल्या देशाची अशी स्थिती झाली आहे.
क्षणचित्रे
१. हिंदु राष्ट्राची घोषणा ऐकून २ मुसलमान मुले आणि १ मुलगी आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांच्यातील एकाने त्याचे नाव अभिषेक सांगितले आणि हिंदु राष्ट्राची तुमची संकल्पना काय आहे ? तुम्ही ही मागणी का करत आहात ? जे आहे ते ठीक चालू आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (मुसलमान हिंदू नाव सांगून हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या विरोधात हिंदूंच्या आंदोलनात येऊन प्रश्न विचारतात. तसे मुसलमानांच्या आंदोलनात जाऊन विचारू शकतील का ? – संपादक)
२. गोव्याच्या अधिवेशनात सहभागी झालेल्या नेपाळच्या धर्माभिमान्यांना आंदोलनासाठी निमंत्रण दिले असता ते आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात